Posts

Showing posts from October, 2024

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 33

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -33-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249. *त्याचा जन्म 11 जानेवारी 1954 रोजी विदिशा मध्य प्रदेश येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.घरात चांगले वातावरण असल्यामुळे त्याला शिक्षणाचे महत्त्व समजले.त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे तो मुलगा इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पदवी मिळवतो.त्यानंतर मास्टर ऑफ इंजीनियरिंग सुद्धा पूर्ण करतो.शिक्षणाच्या काळात सामाजिक अन्याय आणि बालकांवरील होणाऱ्या अत्याचाराची त्याला जाणीव होते.मग तो मुलगा उच्च शिक्षित असूनही 1980 च्या दशकात बालकामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू करतो.तो मुलगा साऱ्या जगाला हे पटवून देतो की अनेक मुलं त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत आणि लहानपणातच त्यांना श्रम करायला लागतात यामध्ये समाजात असमानता  येत आहे.तो मुलगा मुलांच्या शारीरिक रक्षणासाठी बचपन बचाव आंदोलन सुरू करतो ज्याद्वारे 144 देशातील 80 हजार पेक्षा बाल कामगारांना बाल मजुरीतून मुक्त करतो.त्यांचे पुनर्व...

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

Image
 *पुणे जिल्ह्यातील धानोरे शाळेचा राज्यात डंका*  *राज्यातील प्रथम क्रमांकाची स्वच्छ सुंदर शाळा म्हणून सन्मान*  *अखंड महाराष्ट्राचा ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊलींची जिथे समाधी आहे त्या तीर्थक्षेत्र आळंदीपासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही पूर्वेला गेले की एक टुमदार गाव लागते. त्या गावाचे नाव धानोरे. या गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळी ओळख देणारी त्या गावातील आदर्श  जिल्हा परिषद शाळा आज सर्व महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात केंद्रस्थानी आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे.या आदर्श शाळेने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभागाबरोबर धानोरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक सण 2024- 25 मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे मूल्यमापन  केले. या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना विविध उपक्रमा संदर्भात गुणांकन देण्यात आले होते. यात विद्यार्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 132

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -32-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याच्या जन्म 12 नोव्हेंबर 1896 मध्ये झाला.लहानपणी  त्याने एक चिमणी टिपली तिच्या मानेवर पिवळा रंग होता त्याचे कुतूहल जागे झाले.मग मामाच्या मदतीने बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीच्या संचालकांकडे जावून त्याने त्या पिवळ्या रंगाचे कारण जाणून घेतले.त्यानंतर त्याने पक्षी टिपणे सोडून दिले त्याला त्यांच्याबद्दल वेगळे आकर्षण वाटू लागले.पक्षी निरीक्षण करणे त्याचा जणू छंदच होतो.शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर भावाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तो काही काळ ब्रह्मदेश येथे जातो तेथेही तो अनेक जंगले फिरून पक्षी निरीक्षण करतो.पक्षीशास्त्र या विषयावरील पदवीसाठी जर्मनी येथे जातो.काही काळ यासाठीच अभ्यासाठी इंग्लंडला  राहतो.पुढे तो मुलगा भारतात येतो.येथे येवून पक्षांच्या सुमारे 1200 जाती 2100 उपजाती शोधून काढतो.पक्षी अभ्यासावर अनेक शोध निबंध,पुस्तके लिहितो.त्याच्या पक्षी अभ्यासावर सारे जग आकर्षि...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 31

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -31* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *📝*भाग-31*                    *मुंबई मधील पारशी कुटूंबात त्याचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.घरात सगळी सुबत्ता होती. पण त्याच्या आई वडिलांचा संघर्ष वाढत गेला आणि तो दहा वर्षाचा असताना त्याची आई सोनू व वडिल नवल यांचा घटस्फोट झाला.नंतर आजी नवाजबाई  यांनी त्याचा सांभाळ केला.तो मोठा झाल्यावर हॉवर्ड युनिव्हर्सिटी मधून त्याने मॅनेजमेंट डिग्री घेतली तो भारतात आला.त्यांच्या घराण्यातील नियमाप्रमाणे त्याला त्यांच्या व्यवसायातच  कामगार म्हणूनच काम करावे लागले.पुढे त्याच्यावर त्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी आली. स्वतःच्या मेहनतीने तो व्यवसाय  त्याने इतक्या उंचीवर नेला की जगातील अनेक मोठे उद्योग त्या समूहाने खरेदी केले.तो समूह म्हणजे टाटा समूह, आणि टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा तो मुलगा म्हणजे रतन नवल टाटा*.  ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-130

Image
 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -30-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगाल मधील मिराटि- किर्नहार येथे झाला.त्याच्या वडिलांचे नाव कामदा मुखर्जी, जे ब्रिटिश विरोधी लढ्यात सक्रिय होते यात त्यांना दहा वर्ष शिक्षा झाली होती.त्याच्या आईचे नाव राजलक्ष्मी होते.त्याला लहानपणापासूनच शिक्षणात खूप रस होता.त्याचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत होते नंतर तो मुलगा सुरी महाविद्यालयात शिक्षण घेतो. कोलकात्यातील कॉलेजमध्ये राज्यशास्त्र,इतिहास,कायद्याची पदवी घेतो.शिक्षण क्षेत्रात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम करतो.तेथे उत्कृष्ट कामगिरी करतो.राजकारणात असणाऱ्या वडिलांचा प्रभाव त्याच्या पुढील जीवनावर पडतो.पुढे तो मुलगा राजकारणात येतो यात तो इतका यशस्वी होतो की भारत देशाचे वित्तमंत्री,उद्योगमंत्री,परराष्ट्रमंत्री,या सारखी मानाची पदे भूषवताना तो मुलगा भारत देशाचा राष्ट्रपती होतो.तो मुलगा म्हणजे भारतीय राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत...