गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 132


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -32-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याच्या जन्म 12 नोव्हेंबर 1896 मध्ये झाला.लहानपणी  त्याने एक चिमणी टिपली तिच्या मानेवर पिवळा रंग होता त्याचे कुतूहल जागे झाले.मग मामाच्या मदतीने बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीच्या संचालकांकडे जावून त्याने त्या पिवळ्या रंगाचे कारण जाणून घेतले.त्यानंतर त्याने पक्षी टिपणे सोडून दिले त्याला त्यांच्याबद्दल वेगळे आकर्षण वाटू लागले.पक्षी निरीक्षण करणे त्याचा जणू छंदच होतो.शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर भावाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तो काही काळ ब्रह्मदेश येथे जातो तेथेही तो अनेक जंगले फिरून पक्षी निरीक्षण करतो.पक्षीशास्त्र या विषयावरील पदवीसाठी जर्मनी येथे जातो.काही काळ यासाठीच अभ्यासाठी इंग्लंडला  राहतो.पुढे तो मुलगा भारतात येतो.येथे येवून पक्षांच्या सुमारे 1200 जाती 2100 उपजाती शोधून काढतो.पक्षी अभ्यासावर अनेक शोध निबंध,पुस्तके लिहितो.त्याच्या पक्षी अभ्यासावर सारे जग आकर्षित होते.हे जगावेगळे काम करणारा तो मुलगा म्हणजे भारताचे महान पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली उर्फ बर्ड मॅन*.


*त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक मान सन्मान मिळाले यात१९८४ साली औरंगाबाद येथे झालेल्या पक्षिमित्र संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९५८) व पद्मविभूषण (१९७६) हे किताब दिले, तसेच त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. (१९८५), ‘ पक्ष्यांच्या सान्निध्यात ’ हा त्यांच्यावरील दूरदर्शन लघुपट १९८३ साली काढण्यात आला. तमिळनाडू राज्यात कोईमतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्टरी ( SACON ) ही संस्था सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्यात चोडण बेटावरील ‘ डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य ’ पक्षी निरीक्षकांना आकर्षित करीत राहिले आहे*.

*डॉ. सलीम अली हे एक प्रसिद्ध भारतीय जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतीय पक्षीशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी पक्ष्यांच्या वर्तन, जैवविविधता आणि संरक्षणावर महत्त्वाचे संशोधन केले*. 

*डॉ. सलीम अली यांनी मणिपालच्या शिक्षणानंतर मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले*.*त्यांनी अनेक वर्षे भारतीय पक्ष्यांवर अभ्यास केला आणि विविध निबंध, लेख, आणि पुस्तकं लिहिली*.*त्यांच्या "The Book of Indian Birds" या पुस्तकाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि ते आजही पक्षीप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे*.

*त्यांनी भारतीय पक्षी आणि त्यांच्या निवासस्थानांचे संरक्षण करण्यासाठी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला.भारतीय वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांनी* *महत्त्वाचे कार्य केले, ज्यामध्ये 'Bombay Natural History Society' चा सहभाग महत्त्वाचा होता.डॉ. सलीम अली यांच्या कार्यामुळे भारतीय पक्षीशास्त्राच्या क्षेत्रात अनेक नवीन दिशांचा खुलासा झाला आहे*.


*सुगरण पक्षी घरटी कशी बांधतो, त्यांचा विणीचा हंगाम यावर त्यांनी मोठे निरीक्षण करून लिखाण केले.कुमाऊँ तराई भागात फिन्स खाया,कच्छ मधील फ्लेमिंगो,लडाख मधील केन्स हे सारे पक्षी शोध त्यांचेच आहेत. पक्षांची वस्ती,त्यांच्यात हवामानानुसार होणारे बदल,त्यांच्या सवयी,त्यांचा स्थलांतर काळ यांचे अचूक निरीक्षण,लेखन करून त्यांनी जगाला हे दाखवून दिले की पक्षी मेल्यावर तो फक्त भुसा भरून ठेवून निरीक्षणाचे साधन नाही तर पक्षी निरीक्षण त्यापेक्षा अधिक आहे.केरळ ते कच्छ,सिक्कीम ते अरुणाचल प्रदेश असा सारा प्रदेश त्यांनी पालथा घालून पक्षी निरीक्षण केले.पेन्सिल,कागद,संयम,व दुर्बीण यावरच त्यांनी इतके दुर्मिळ संशोधन केले.त्यांच्या कार्यामुळे अनेक हौशी पक्षी निरीक्षक तयार झाले.आणि ही परंपरा पुढे सुरू राहिली. भारताचे पक्षी पुरुष डॉ.सलीम यांचे आयुष्य आपल्याला हेच सांगते ."ध्येय साधण्याचे पहिले पाऊल म्हणजे त्याच्या दिशेने एक पाऊल टाकणे."यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी वेळ लागतो, पण जिथे मेहनत आहे, तिथे यश निश्चित आहे यावर तुमचा दृढ विश्वास हवा*."

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०