गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९४
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -94-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*बिहार राज्यातील शहाबाद जिल्ह्यातील दुमराव येथे त्याचा जन्म 21मार्च 1916 मध्ये झाला.सनई वाजवणे हा त्याचा घराण्याचा मूळ व्यवसाय. त्यामुळे लहानपणीच।त्याच्या कानावर सनई चे सूर पडत असे.हे सुरांचे संस्कार त्याने उत्तमरित्या आत्मसात केले होते.त्याचे मामा अलिबक्ष यांच्याकडे त्याने सनई वाजवण्याचे शास्रशुध्द शिक्षण घेतले.लहान वयातच अलाहाबादच्या संगीत परिषदेत त्याच्या सनई वादनाचा कार्यक्रम होतो.त्यानंतर तो मागे वळून पहात नाही. तो सनईच्या सुरांचा जणू महानायक बनतो. साऱ्या जगाला सनईच्या स्वप्नवत सुरांची ओळख करून देतो.सनई नाव आले की त्याचे नाव जोडले जाणारच इतके अफाट यश तो मिळवतो.ही संगीताची साधना करणारा तो मुलगा म्हणजे जगप्रसिद्ध सनई वादक बिस्मिल्ला खाँ*.
बिस्मिल्ला खाँ यांनी कोलकत्ता, लखनौ यासारख्या मोठ्या शहरात सनई वादनाचे कार्यक्रम करून लोकांची वाहवाह मिळवली.त्यानंतर ते अनेक सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.त्यांच्या सनई वादनातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न,पदमविभूषण,रॉयल नेपाळ आर्ट अँकॅडमी,संगीत अकादमी यासारखे असंख्य मनाचे पुरस्कार मिळाले.एक फुंकर मारून वाजवायचे वाद्य पण आपल्या अद्भुत तंत्राने आणि शैलीने त्यात बिस्मिल्ला खाँ यांनी जादू निर्माण केली.
*ख्याल,ठुमरी,कजरी,पूरवी,यासारख्या लोकसंगीतावर आधारित धून ते जितक्या कौशल्याने वाजवीत त्याहून सुरेल असे रगदारीचे सूर त्यांच्या सनईतून बाहेर पडत असे.भारत्याच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर सनई वादन करणारे बिस्मिल्ला खाँ 50 वर्ष स्वातंत्र्याला झाल्यावर त्याच लाल किल्यावर सनई वाजवायला होते.हा कलेचा अतिउच्च झालेला सन्मान म्हणावा लागेल.बिस्मिल्ला खाँ यांचे जीवन हेच शिकवते की गोष्ट कुठलीही असुद्या त्याची एकदा साधना केली,त्यासाठी अफाट परिश्रम घेतले की तुम्ही जे काम करता ते संस्मरणीय ठरते.सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्यासाठी*.

Comments
Post a Comment