गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -97-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी त्याचा जन्म झाला.औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण झाले.लहानपणापासून त्याला कवने करण्याचा छंद होता.गावातील तमाशाच्या फडासाठी त्याने लावण्या रचल्या आणि त्या गावोगावी पोहचल्या. मग त्याने स्वतःचा फड उभा केला.स्वरचित लावण्या लिहणे त्या गाणे,गण गौळण,भेदीक, रंगबाजीच्या,झगड्याच्या अशा अनके एकाहून एक सरस लावण्या त्याने लिहल्या.त्यांच्या रचना लाखाच्या घरात आहे असे म्हणतात.इतके अद्भुत साहित्य लेखन करणारा तो मुलगा म्हणजे श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव*.
बापूराव यांनी लिहलेले मिठाराणीचा वग हे वगनाट्य महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय झाले.ते असताना त्यांची लावणीची 'पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या व गवळणी भाग पहिला','पठ्ठे बापूराव यांच्या ढोलकीवरील दिलखुलास लावण्या' अशी दोन पुस्तके प्रसिध्द झाली.पुढे त्यांच्या लावण्यांचे भाग 1,2,3, प्रकाशित झाले.याला न चि केळकर यांचे प्रास्ताविक लाभले आहे.
*बापूराव यांच्या लेखनात बेपर्वाई असली तरी जसा प्रसंग असेल तसा ठसकेबाज समर्पक शब्द वापरणे हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य.त्यामुळेच न.चि. केळकर यांनी त्यांना दिलेला शीघ्रकवी हा किताब सार्थ ठरतो.चौदा रत्नांचा जन्म,'ता' अक्षरांची भेदक लावणी. यावरून त्यांचे लावणीवरील प्रभुत्व अधोरेखित होते.त्यांची मुंबई ची लावणी त्याच पठडीतील .वग,गौळणी,पदे,कटाव,सवाल जवाब यांनी एक काळ बापूराव यांनी गाजवला.त्यांनी लावणीला एक उंची प्राप्त करून दिली.बापूराव यांनी त्यांचा आनंद त्यांना जे आवडत होते त्यात शोधला. यातून आपल्यालाही हेच शिकायला मिळते की तुम्हाला जे आवडत असेल ते काम मनसोक्त करा.आपल्या आनंदाच्या जागा स्वतःच शोधा, स्वतःच्या मनाशी दिवसातून एकदा तरी बोला*.

Comments
Post a Comment