गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९१

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -91-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248     

                   


  *तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यातील मेलासरक्कलविलै गावात 14 एप्रिल 1957 मध्ये झाला. वडील कैलासवदीवू व आई चेल्लम हे शेतकरी.तो लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचा असतो.त्याचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत तामिळ या मातृभाषेत शिक्षण होते .तो मुलगा मद्रास येथील MIT मध्ये एअरोस्पेस मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवतो.पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथून पी.एच.डी पदवी मिळवतो.तो मुलगा पालिकेच्या शाळेत शिकूनही इस्रो सारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनतो.तो मुलगा म्हणजे भारताचे महान शास्त्रज्ञ के.सीवन ऊर्फ रॉकेट मॅन*.                 


सीवन यांचे अवकाश कार्यक्रमातील क्रयोजनिक इंजिन बनवणे,मिशन डिझाईन उपप्रणाली पातळीचे प्रमाणिकरण ज्याचा वापर प्रक्षेपण वाहनात केला जातो,डे ऑफ लॉंच पवन बायसिक ज्याचा वापर कोणत्याही वातावरणात रॉकेट प्रक्षेपण करण्यासाठी होतो,ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक या सर्व प्रणाली,इस्रो ने एकाच वेळी 104 उपग्रह सोडण्याची मोहीम यामध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सत्यभामा विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स,भारतीय अंतरिक्ष संगठन गुणवत्ता पुरस्कार,डॉ.विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार,यासारखे अनके सन्मान मिळाले.                       



*भारताच्या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण त्यांनी केले.अशी कामगीरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला.विक्रम लँडर चा संपर्क तुटल्याची घोषणा त्यांनीच यावेळी केली.भारताचा सर्वात शक्तिशाली उपग्रह जीएसएलव्ही निर्मितीत त्यांचा वाटा मोलाचा होता. फाडफाड इंग्रजीच्या जमान्यात मातृभाषेचे बोट धरत सीवन इतके मोठे झाले.शेतकऱ्याच्या घरात जन्म होऊनही त्यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही.ते लढत राहिले आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी ही झाले*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०