गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९५

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -95-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                       *रशिया देशातील मास्को शहराजवळील क्लुशिनो या छोट्याशा गावी त्याचा जन्म 9 मार्च 1934 साली झाला.वडील सुतारकाम करत असे.घरात कुणीही उच्चशिक्षित नाही.पण त्याच्या आईला वाचनाची खुप आवड होती.ती गोडी त्यालाही लागली.दुसऱ्या महायुद्धात इतर कुटूंबाप्रमाणे त्याच्या कुटूंबाचेही  प्रचंड हाल झाले.त्यानंतर स्थैर्य आल्यावर सर्व भावंडांचे शिक्षण सुरू झाले. एका सामान्य कुटूंबात घरात त्याचा जन्म झाला होता तरी तो मुळातच तल्लख बुद्धिमत्तेचा होता.ते ओळखूनच त्याचे शिक्षक त्याला शिक्षणात मदत करत असे.त्याचे गणिताचे शिक्षक दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मी एअरफोर्स मध्ये प्रवेश घेतात.तेव्हापासून त्याचे एअरफोर्स मध्ये आकर्षण  वाढते.पुढे तो एअरो क्लबचा सदस्य होतो. पायलट पदाची परीक्षा पास होतो,पोस्ट ग्रॅज्युएशन  करतो.पुढे तो मुलगा जगातील पहिला अंतराळवीर मान्यता पावतो.तो मुलगा म्हणजे पृथ्वीला अंतरिक्षयानातून अंतराळ फेरी घालणारा पहिला अंतराळवीर युरी गागारीन*.  

                   


  1960मध्ये 20 अंतराळवीरांपैकी युरी गागारीन यांची एकट्याची सोव्हिएत अंतराळ कार्यक्रमांतर्गत निवड झाली होती.त्यानंतर त्याच्या अवकाशातील ट्रेनिंगला सुरवात झाली.   ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर युरी यांनी 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळयानातून अंतराळात प्रवेश करून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली,आणि युरी यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. 

              


*अंतराळ यान तेथील वातावरण हाताळण्याची क्षमता या अद्वितीय  गुणांमुळे युरी यांना या आगळ्यावेगळ्या आणि पूर्णतः नवीन असणाऱ्या  क्षेत्रात यश मिळाले.त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा रशियाने सोव्हिएतवीर म्हणू  गौरव केला.अंतराळ कार्यक्रमात काही चाचण्यात व्यस्त असताना वयाच्या अवघ्या  34 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.उणेपुरे 34 वर्षे आयुष्य लाभलेल्या युरी गरीब घरात जन्माला येऊनही अंगी  असणाऱ्या साहस,चिकाटी,कर्तव्यक्षमता या साऱ्या गुणांमुळे इतरांपेक्षा वेगळे ठरले आणि अल्पाआयुष्यातही आपला अजरामर ठसा सोडून गेले*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०