स्काॅलरशिप - समूहदर्शक शब्द


 






*एका पेक्षा जास्त वस्तू , घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांना समूहदर्शक शब्द म्हणले जाते*.


1) समूह : शब्द

2) आंब्याच्या झाडांची : आमराई

 3)उतारुंची : झुंबड

4) उपकरणांचा : संच

5) उंटांचा/ लमानांचा : तांडा

6)केसांचा : पुंजका, झुबका

7) करवंदाची : जाळी

8) केळ्यांचा : घड, लोंगर

9)काजूंची : गाथण

10)किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा

11)खेळाडूंचा : संघ

12)माशांची : गाथण

13)गाईगुरांचे : खिल्लार

14)गुरांचा : कळप

15)गवताचा : भारा

16)गवताची : पेंडी, गंजी

17)चोरांची, दरोडेखोरांची : टोळी

18)जहाजांचा : काफीला

19)ताऱ्यांचा : पुंजका

20)तारकांचा : पुंज

21)द्राक्षांचा : घड, घोस

22)दुर्वाची : जुडी

23)धान्याची : रास

24)नोटांचे : पुडके

25)नाण्यांची : चळत

26)नारळाचा : ढीग

27) नारळांची - पेंड

 28)पक्ष्यांचा : थवा

29)प्रश्नपत्रिकांचा, पुस्तकांचा : संच

 30)पालेभाजीची : जुडी, गड्डी

31)वह्यांचा : गठ्ठा

32)पोत्यांची, नोटांची : थप्पी

33)पिकत घातलेल्या आंब्याची : अढी

34)फळांचा : घोस

35)फुलझाडांचा : ताटवा

 36)फुलांचा : गुच्छ

37)बांबूचे : बेट

38)भाकरीची : चवड

39)मडक्यांची : उतरंड

40)महिलांचे : मंडळ

41)लाकडांची, उसाची : मोळी

42)वाद्यांचा : वृंद

 43)विटांचा, कलिंगडाचा : ढीग

44)विद्यार्थ्यांचा : गट

45)माणसांचा : जमाव

46)मुलांचा : घोळका

47)मुंग्यांची : रांग

48)मेंढ्याचा : कळप

49)विमानांचा : ताफा

50)वेलींचा : कुंज

51)साधूंचा : जथा

52)हरणांचा, हत्तींचा : कळप

53)सैनिकांची/चे : तुकडी, पलटण, पथक

54)ढगांचा : घनमंडल

55)फळांचा : घोस

56)मुलांचा, मुलींचा : घोळका

57)माणसांचा : घोळका

58)पोळ्यांची : चवड, चळत

59)घरांची : चाळ

60)केसांची : जट

61)चाव्यांचा : जुडगा

62)वानरांची : टोळी

63)वाळूचा : ढीग

64)फुल झाडांचा : ताटवा

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०