गोष्ट माझ्या आईची भाग ३१

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*मोहन वाघ,मराठी नाट्यनिर्माते*            

  📔       *भाग - 31*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते शारदा.मी अगदी लहान असताना  माझे वडील देवाघरी गेले.त्यामुळे माझी आईच माझा आदर्श आणि सर्वस्व होते.माझे लहानपण कारवार मध्ये केले.माझे वडील लहानपणी वारले आहे याची जाणीव मला कधी होवू नये यासाठी आई खूप काळजी घेत असे.मला हे कायम जाणवायचे*.


*माझ्या जन्माच्या वेळी आई संगीत नाटक बघत होती,तेव्हा तिला कळा सुरू झाल्या आणि माझा जन्म झाला.जणू नाटक वेडाचे संस्कार माझ्यावर लहानपणी  झाले होते. तू कायम सत्यवचनी रहा,तुझे क्षेत्र कोणतेही असो त्यात ठसा ठेवून जा,अशी तिची शिकवण होती*.


*मी मुंबईला आल्यावर आईला मला सोडताना जीवावर आले होते.मग मी आईलाच मुंबईला घेऊन आलो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता.काही दिवस फोटोग्राफर म्हणून काम केले यामुळे खूप लोकांशी संबंध आला.मराठी हिंदी चित्रपटात व नाट्य विभागातील अनेकांचे फोटो मी काढले आणि ते प्रचंड लोकप्रिय ही झाले.छायाचित्र काढता काढता मी नाट्य निर्मितीकडे वळलो.पुढे नेपथ्य,प्रकाश योजना,लेखन या क्षेत्रात मी अनेक नवनवीन विक्रम केले.स्वतःचा ठसा उमवू  शकलो.याचे सारे श्रेय आईला जाते*.


*आई पालखी असते मुलाची, ही पालखी काळजीने वाहत असते कायम ओझे मुलांसह साऱ्या कुटुंबाचे.देवासारखी तिलाही  पालखीतून परवानगी नसते बाहेर येण्याची सगळे देवाचे सोहळे झाल्याशिवाय*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०