गोष्ट माझ्या आईची भाग ४०

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*स्वामी विवेकानंद*            

  📔       *भाग - 40*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते भुवनेश्वरीदेवी.कलकत्ता येथील सिमोलिया पथावर आमचे मोठे घर होते.येथेच माझे बालपण गेले.माझे वडील विश्वनाथबाबू कोलकत्यातील नावाजलेले वकील होते.श्रीमंत,गरीब सारीच लोक त्यांच्याकडे कामे घेऊन येत.त्यावेळी आई सर्वांची यथायोग्य काळजी घेत.घरी आलेल्या  व्यक्तीला योग्य मान द्यायचा,ती व्यक्ती आपल्या घरी कायम कायम येत नाही पहिला संस्कार माझ्यावर झाला*.


*माझी आई नेहमी प्रसन्न,शांत असायची.सात्विक आणि सदाचार हे सारे गुण मला तिच्याकडूनच  मिळाले.ती वडिलांना सर्व कामात मदत करत असे.मी झालो तेव्हा आईने माझे नाव विरेश्वर ठेवेल होते,मग मी नरेंद्र झालो,ती लाडाने मला बिले म्हणत*.


*मोठा झाल्यावर समजासाठी वेगळे काहीतरी करताना तू लोकांचा कृष्णा सारखा सारथी हो,अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकताना त्याने जसे अर्जुनाला ज्ञान दिले तसच तू  समाज शिक्षित करत जा हे आईचे संस्कार मी मोठे झाल्यावरही कायम राहिला*.


*मातृभूमीच्या उत्कटप्रेमाने मी भारतभर भटकंती केली, पण यात मी भेदभावला कधीही थारा दिला नाही,ही आईचीच प्रेरणा होती.माणसाने पैसे कमवावे पण त्यातील काही वाटा हा दानधर्मासाठी असावा,संस्कार मला घरातूनच मिळाला होता.सात्विक आई आणि तितकेच प्रेमळ बाबा मिळाले.म्हणूनच स्वामी विवेकानंद या साऱ्या विश्वाला मिळाले*.


*आई दुःखाच्या वाटा तुडवत तुडवत मुलेरुपी फुले पदरात सावरत सांभाळते,ती रस्त्यात कुठेही पडणार नाही याची काळजी घेते आयुष्यभर.जणू काही विखुरलेल्या काचा जमा करा करून आई बनवत असते संसाराचा आरसा*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०