गोष्ट माझ्या आईची भाग ४१

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*अब्राहम लिंकन*           

  📔       *भाग - 41*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते नॅन्सी हॅस्क.माझा जन्म एका लाकडाच्या खोपटात जरी झाला असला तरी आईसाठी मी अनमोल होतो.माझे वडील थॉमस शेतकरी होते.अत्यंत गरीब कुटुंबात जन्म असूनही आईने प्रचंड मेहनत घेऊन माझे पालन पोषण केले.माझ्या आजोबांच्या नावावरून माझे नाव अब्राहम ठेवण्यात आले होते.आईने केलेला संघर्ष लहानणापासूनच मी पहात आलो होतो.माझ्या नशिबात पहिल्या आईचे प्रेम कमी आले.मी सात वर्षाचा असताना माझी आई मला सोडून गेली*.


*नंतर माझ्या आयुष्यात आलेल्या सारा बुशा या सावत्र आईने मला खूप जीव लावला.ती स्वतंत्र विचारांची होती.मला ती नेहमी सांगायची आपल्याला जी गोष्ट पटत नाही तिला नकार द्यावा.प्रसंगी त्यासाठी स्पष्ट बोलावे.माणुसकीला  काळीमा फासणारी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी तिच्या संस्काराचा फार मोठा प्रभाव माझ्यावर पडला*.


*जीवनात कितीही वेळा अपयश आले तरी त्यातून यशस्वी बाहेर पडता आले पाहिजे.तू ज्या परिस्थितीतून आलो आहोत ती परिस्थिती कधीही विसरू नये या तिच्या विचारांनीच मला अमेरिका सारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष होता आले*.


*मुलाचे आयुष्य हेच आईचे आयुष्य असते.त्याच्या किंवा तिच्या आयुष्यातील घडामोडी हेच आईचे वर्तमापत्र होते.आई अंगणात असते तशी ती आकाशातही असते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०