गोष्ट माझ्या आईची भाग ३३

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*मदर तेरेसा सामाजिक कार्यकर्त्या*            

  📔       *भाग - 33*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझी आई सांगायची आपल्याला स्वतःला दुःख झाले की खूप रडू येते.पण दुसऱ्याला दुःख झाले की आपल्याला रडू यायला पाहिजे,त्याच्या मदतीसाठी धावून जाता आले पाहिजे.आणि असा माणूस आपण झालो तरच आपल्यावरील संस्कार उपयोगाचे आहेत*.


*मी व आई एकदा चर्च मधून घरी येत होते एक मांजर चिखलात पडले होते.त्याला मी हात लावत नव्हते.आईच्या ते लक्षात आले.तेव्हा तीने मला सांगितले"आपल्या शरीरापेक्षा जीव महत्वाचा.शरीर कोणत्याही रंगाचे,कोणत्याही अवस्थेत असेल पण जीव मात्र सर्वांचा सारखाच असतो.जो जीव तुझ्या शरीरात तोच मांजराच्या शरीरात असतो.मी कलकत्ता येथे उंदरांनी,मुंग्यांनी कमरेखाली  कुरतडून खाल्लेला एक ईसम उचलला तोही आई मुलाला जवळ घेते तसा.तेव्हा मला मांजर आणि आईची शिकवण आठवली*.


*मी जेव्हा नन होवून शिक्षिका झाले तेव्हा आई म्हणाली"तू शाळेत शिक्षिका म्हणून जात नाही तर तू तुझ्या लेकरांना ज्ञान देण्यासाठी जात आहेत हे विसरू नको".मी माझे आयुष्य गरिबांच्या रुग्ण सेवेसाठी वेचले यामागे आईचे संस्कार खूप मोलाचे होते*.


*मला नोबेल पुरस्कार घ्यायला बोलावले तेव्हा विशिष्ठ पोशाखात यायला सांगितले होते त्याला मी नकार दिला.मी सांगितले निळ्या बॉर्डर ची साडी व तसाच ब्लाऊज घालून येईल हे शक्य नसेल तर पुरस्कार रद्द करून टाका. पुरस्कारानंतर देण्यात येणारी लाखो डॉलर ची पार्टी मी रद्द करायला लावली.ती देणगी मी अनाथ मुलांसाठी वापरली.हे सारे संस्कार आईचे होते*.


*आई मुलांसाठी पाऊस सांभाळत राहते पदरात.त्या पदराखाली मुलांना ऊन,वारा,पाऊस,वादळ कशाची म्हणून भीती नसते.जगातील प्रत्येक आईच्या पदराचा रंग वेगवेगळा असला तरी त्यामागील भावना मात्र एकच असते ती म्हणजे माझे मूल जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी सुरक्षित असावे*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०