गोष्ट माझ्या आईची भाग 34

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*रामदास पाध्ये बोलक्या बाहुल्या कलावंत*            

  📔       *भाग - 34*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते ताराबाई.माझे वडील यशवंत यांना बोलक्या बाहुल्यांचे  खेळ करण्याचा छंद होता. आवडाबाई व अर्धवटराव ही माझ्या वडिलांचीच निर्मिती.मी लहान असताना बाहुल्या कशा बोलतात याचे मला आश्चर्य वाटायचे.त्यासाठी मी एक दिवस बाबांची एक अख्खी बाहुली उसवली त्यातील कापूस काढला.मला वाटले बाबा रागवतील पण तसे झाले नाही उलट आई म्हणाली त्याचे हे कळायचे वय नाही मोठा झाल्यावर तो बहुल्यांना प्राणापलिकडे जपेल आणि झालेही तसेच*.


*या छोट्या कृतीतून आईने माझ्यावर जबाबदारीने वागण्याचा संस्कार केला.आम्ही कधी चुकीचे काही करणार नाही यावर आईचा ठाम विश्वास होता त्यामुळे आम्ही अधिक सुजाण आणि जबाबदार झालो*.


*मी अभ्यासही भरपूर केला. बी. एस्सी मॅथ उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो.पुढे मेटल बॉक्स कंपनीत काम करत असताना मलाही बाहुल्यांचे खेळ करण्याचा छंद जडला.यात मला प्रचंड विश्वास आला.मग मी नोकरी सोडून बाहुली खेळात करिअर करण्याचे ठरवले.आईला हा विचार सांगितला ती म्हणाली"तुला पूर्ण विश्वास असेल,की या क्षेत्रात मी यशस्वी होईल तर सोडून दे नोकरी.दोन वर्ष मी तुला दरमहा काही रक्कम देईल.या दरम्यान तुला बाहुली खेळात यश नाही मिळाले तर तू नोकरी करायची."तिच्या या शब्दाने मला नवी उमेद मिळाली आईमुळेच मी अर्धवटराव व आवडाबाई  या बाहुल्यांचा जगभर खेळ करू शकलो.आई नसती तर हे कधीच शक्य झाले नसतो*.


*आई मुलांसाठी स्वतःला कायम भरडत रहाते आयुष्यभर.कधीही कुरकुर न करता.तिच्या कुंकवाला इतरांपेक्षा मूठभर का होईना जास्त बळ देते आई.मुलांसाठी स्वप्नांचे आभाळ घेऊन फिरण्याची क्षमता फक्त आईकडेच असते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०