गोष्ट माझ्या आईची भाग २१

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝श्रीधर फडके -गायक संगीतकार .*            

  📔       *भाग - २१*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते ललिता.लग्नाआधी ती उत्तम गायिका होती.तिची गायनाची कारकीर्द बहरली असताना माझ्या बाबांशी तिचे लग्न झाले.त्यावेळी आमची स्थिती फारशी चांगली नव्हती.माझे वडील बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचा संघर्षाचा काळ होता.अशावेळी वडिलांना तिने भक्कम साथ दिली.आणि आपली गायनाची कारकीर्द बंद केली.वडिलांना घरात काहीच बघावे लागणार नाही इतका त्याग तिने केला.आपल्या माणसासाठी किती टोकाचा त्याग सहज करता येतो याचा वस्तुपाठ तिने सहज घालून दिला*.


*आई बाबांबरोबर सावली सारखी गेली कायम बरोबर.आमच्या घरात छानपैकी गाणे,संगीत यांची मैफिल रंगत असे.अशा वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो.आमच्यावर आईने शिस्त,नेटकेपणा,स्वच्छ्ता, ज्ञानसंपन्नतेचे संस्कार केले.आम्ही कुण्या बड्या बापाची मुले आहोत याचा वाराही तिने आम्हाला कधी लागू दिला नाही.तिने वडिलांसाठी कोणता त्याग केला कधी बोलून दाखवले नाही*.


*"तू संगीताची साधना जरूर कर पण आधी उत्तम शिक्षण घे तुझे उपजीविकेचे साधन शोधून ठेव.म्हणजे तुला संगीताची साधना अधिक चांगली करता येईल."हे तिने कायम सांगितले यातूनच मी एम एस्सी फिजिक्स,नंतर कॉ्प्यूटर सायन्स केले. एअर नोकरी केली.त्यावेळी संगीत साधना ही सुरू होती*.


*"संगीत क्षेत्रात पाऊल ठेवताना तुझे स्वतःचे अस्तित्व निर्माण कर बाबूजींचा मुलगा म्हणून जगू नको"हा मोठा संस्कार आईने माझ्यावर केला आणि तो मी  संगीतकार होताना आयुष्यभर जपला*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०