गोष्ट माझ्या आईची भाग- १६

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝ताराबाई मोडक थोर शिक्षण प्रसारक .*            

  📔       *भाग - १६*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती अतबोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*पूर्वीच्या काळी महिलांना घराबाहेर पडायला मनाई होती.या कठिण काळातही माझ्या आईने चांगले शिक्षण घेतले होते.ती नर्स ची नोकरी करत होती.आमच्या घरात त्या काळातही पुरोगामी वातावरण होते. माझ्या वडिलांनी निश्चय केला होता लग्न करेल तर विधवा महिलेशी.त्यांनी केलेही तसेच आणि माझी आई घरात आली.त्या काळात ब्राह्मोसमाज पद्धतीने झालेला तो पहिला विवाह होता*.


 *अनिष्ट प्रथा परंपरा याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे हा मला पहिला धडा जसा वडिलांकडून मला मिळाला तसा तो आईकडूनही मिळाला*.*कुणाचे काही भले होते असेल तर समाजाची बंधने झुगारून द्यायला मागे पुढे पाहू नको हे ती कायम सांगत असे*.


*आईचे संस्कार होते म्हणून कोसबाडच्या टेकडीवर मुलांना समजेल अशा भाषेत शिक्षण देणारी आगळीवेगळी शिक्षण पद्धती उदयाला आली.स्वतःचा संसार सगळे करतात आपण इतरांसाठी जगायला हवे.त्यासाठी त्याग करायला हवा ही शिकवण आईची होती.कितीही अडचणी जीवनात आल्या तरी आपण इतके मोठे व्हावे की अडचणी खुज्या होतील असे आई सांगायची*.


*ताराबाई मोडक इतक्या मोठ्या शिक्षणतज्ञ झाल्या  यामागे त्या काळातही आपल्या मुलीला मोठी स्वप्न दाखवणाऱ्या त्यांच्या आईचे वेगळेपण अधोरेखित होते*.


*आई ही शिक्षिका असते घरात आणि शाळेतही,जणू बाई आणि गुरुजी मध्ये दिसत असतो आईचा हात अक्षरे गिरवण्यासाठी*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०