गोष्ट माझ्या आईची भाग -९
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.*
📔 *भाग - ९*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव शांता.माझ्या वडिलांनी मला बुद्धिबळाची गोडी लावली.आमचे सांगलीत जनरल स्टोअर होते.आम्ही श्रीमंत नसलो तरी सुखी होतो.माझे वडील लहानपणीच गेले पण आई खचली नाही आई व वडील या दोन्ही भूमिका तिने लीलया पार पाडल्या.घरात मी लहान असल्यामुळे माझे सगळीकडे लाडही झाले.जेव्हा मी बुद्धिबळात चमकू लागले तेव्हा बाहेरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू लागली.त्यावेळी मुलींनी बाहेर गावी राहणे ही कल्पनाच कुणी केली नव्हती पण आई ठामपणे उभी राहिली.अनेक स्पर्धांमध्ये दादा,नाहीतर ताई माझ्या बरोबर असे.*
.
*मला डॉक्टर व्हायचे होते,पण थोड्या गुणांनी प्रवेश हुकला.तेव्हा आईने सांगितले "नाउमेद व्हायचे नाही,अपयश देखील हसतमुखाने पचविता आले पाहिजे."माझ्या खेळासाठी, सरावासाठी, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जेव्हढा म्हणून खर्च करणे आवश्यक होते तो माझ्या कुटुंबाने केला,तोही त्याची जाणीव करून न देता.मी जिंकले की आई घरात अक्षरशः दिवाळी साजरी करायची.ती मला सांगायची"यशासाठी खेळू नको,उच्च दर्जाचा खेळ खेळण्यासाठी खेळ,यश आपोआप तुझ्या पायाशी येईल.खेळातील चुकांवर नाराज होण्याऐवजी त्या परत कशा होणार नाहीत यावर लक्ष केंद्रित कर.*"
*मी १९८४साली ब्रिटिश चेस चॅम्पियन जिंकले तेव्हा सांगलीत गणेश संस्थानच्या हत्तीवरून माझी मिरवणूक काढली तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली.*
*भाग्यश्री ठिपसे बुद्धिबळ खेळात प्रचंड यशस्वी झाल्या यामागे वडील गेल्यानंतर आईने दिलेली भक्कम साथ मोलाची होती.कारण वडिलांनी जग सोडले तरी आईला आपल्या पिलांसाठी पावसात वाहून जायची मुभा नसतेच कधी*.
Comments
Post a Comment