गोष्ट माझ्या आईची भाग-८

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 निशिगंधा वाड.*            

  📔       *भाग - ८*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव डॉ. विजया वाड.संसार,शाळा,आमच्या जबाबदाऱ्या हा सगळा व्याप सांभाळून ती खुप खुप शिकली.त्यातूनच आमच्यावर संस्कार होत गेले.आपण ज्ञानवंत झाले पाहिजे,खुप शिकले पाहिजे हा संस्कार आमच्या मनावर न करताही आपोआप होत गेला.तिने आम्हाला आमच्या आयुष्यात पूर्ण स्वातंत्र्य दिले.माझी बहिण माझ्यापेक्षा हुशार होती पण तिने घरात त्याची कधी तुलना केली नाही*.


*एकदा नाट्यगृहात मी प्रयोग केला तेव्हा मी खुप लहान होते.त्याच दिवशी मुंबईला खुप पाऊस झाला.सारे बंद पडले होते.मी आणि बाबा दादर हून विक्रोळी ला चालत घरी आलो.आईने त्या दिवशी माझ्या पायाला रात्री किती वेळ तेल लावले होते.माझ्यासाठी तिने नाटके लिहली,भाषणे लिहली,सांगण्यासाठी गोष्टी लिहिल्या,कविता लिहल्या सार काही केलं. म्हणूनच निशिगंधा वाड तुम्हाला यशस्वी दिसत आहे*.


*बारावीत मी मेरिट मध्ये आले तेव्हा सगळे चकित झाले पण आई नाही कारण तिला याची खात्री होती.मी मालिका चित्रपट विश्वात स्थिरस्थावर झाल्यावर पी.एच.डी केली यात माझ्या आईची प्रेरणा खुप मोठी आहे.माझ्या आईचे संस्कार आणि  माया हेच मी माझे धन मानते*.


*निशिगंधा वाड इतक्या प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या यामागे आईची जिद्द आणि चिकाटीही मोठी होती.प्रत्येकाची आई मनात तशीच असते,आई कधीच घर सोडून जात नाही,घराच्या कोपरे निघालेल्या भिंतीनाही तिने लळा लावलेला असतो*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०