गोष्ट माझ्या आईची-भाग 5
*📝गोष्ट माझ्या आईची*
*हिंदुहृदयसम्राट- बाळासाहेब ठाकरे .*
📔 *भाग - 5*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते रमा.ती अत्यंत हुशार होती.तिचे माहेरचे नाव होते मंजुळा.लहानपणीच तिचे पितृछत्र हरपले होते.शाळेमध्ये तिचा त्या काळात कायम पहिला नंबर येत असे बाराव्या तेराव्या वर्षी तिचा विवाह झाला आणि प्रपंच्याच्या व्यापणे तिचे शिक्षण थांबले.तिला वाचनाची खूप आवड होती.आमची परिस्थिती त्या काळी खूप प्रतिकूल होती.त्यामुळे घरात खुप अडचणी होत्या*.
*पाच बहिणीनंतर माझा जन्म झाला,तोही पौष महिन्यात.माझी आजी शुभ अशुभ मानणारी होती.पण माझी आई म्हणायची माझा बाळ खुप मोठा होईल.माझा जन्म झाला आणि ज्या छापखाण्यावर आमचे घर चालत असे त्यावर जप्ती आली.या कठिण परिस्थितीत आई उभी राहिली ठामपणे*.
*आम्ही भिवंडीला होतो त्या वेळी वडिलांचे पैसे हाती पडेपर्यंत उशीर व्हायचा खुप अडचणी यायच्या,आईच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे.मी माझे चिमुकले हात तिच्या गळ्यात अडकवून तिला धीर द्यायचो,तू काळजी करू नकोस.स्वतः साठी ठेवलेला घास घरातल्या पाहुण्यांना देवून स्वतः उपाशी राहण्याच्या वृत्तीतून आमच्यावर दातृत्वाचा संस्कार झाला*.
*कुणाचा मिंधेपणा पत्करणार नाही,ही वृत्ती तिच्या निश्चयी स्वभावातून आमच्यावर संस्कारित झाली.गरजू असलो तरी लाचारी पत्करनार नाही,वेळ पडली तर गरजेलाही ठोकर मारू हा बाणेदारपणा आईनेच मला शिकवला.मी जेव्हा व्यंगचित्रकार म्हणून फ्री प्रेस मध्ये रुजू झालो तेव्हा माझी केबिन इतकी नीटनेटकी ठेवली की शाईचा किंवा रंगाचा शिंतोडा त्यात कधी उमटला नाही.हा नीटनेटके पणाचा गुण आईकडून मला आला*.
*बाळासाहेब ठाकरे नावाचे गारूड आज अनेक वर्षांनीही कित्येक लोकांच्या मनावर जसेच्या तसे आहे याचे कारण त्यांच्या जडघडणीत आईचा असेलाला मोठा वाटा.आई असल्यावर हसू येते.आई नसल्यावर रडू येते.आई गेल्यावर बाहेर पाऊस कोसळत असला तरी घरात आपले कोणीच नसते*.
Comments
Post a Comment