गोष्ट माझ्या आईची भाग -२२

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝सुहासिनी ऊर्फ सुहास जोशी प्रसिद्ध अभिनेत्री .*            

  📔       *भाग - 22*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते सरस्वती.तिला गाणे फार आवडायचे.तिला इतरही कलामध्ये फार रस होता.मी गायक व्हावे असे तिला कायम वाटत असे.माझी आवड म्हणून मी संगीत विशारद पर्यंत परीक्षा दिली होती*.


*माझे बाबा आणि आई या दोघांनाही नाटकाची खुप आवड होती.तीच आवड मला लागली.मी फर्ग्युसन कॉलेज मध्ये होणाऱ्या नाटकात काम करू लागले.ज्या काळात नाटकात महिलांची भूमिका पुरुष करत असे त्या काळात आईने मला नाटकात काम करायला परवानगी दिली.याला सर्वांचा विरोध पण आई बाबा मागे ठामपणे  उभे राहिले*.


*कमी पैशात काटकसरीने कसे जगावे हे आईने मला शिकवले.मी नाटकात काम करताना अनेकांनी शंका कुशंका घेतत्या पण आई म्हणायची"तू तुझे संस्कार सांभाळ,बोलणारे बोलत राहतील,यातूनच तू मोठी होणार आहे."दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज केला तेव्हा  ६९ साली यात महाराष्ट्रातील दोघींनीचीच निवड झाली.पुण्यातून मी आणि मुंबईतून प्रतिभा मतकरी.त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.माझे गाजलेले बॅरीस्टर हे नाटक आईने पाहिले आणि तिने माझा अभिनय पाहून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.सुहासिनी जोशी इतक्या प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या यात आईचे पाठबळ  फार मोठे होते*.


*आई एक दिवा लावते तो कायम तेवत राहिल याची काळजी घेते.आईच्या श्रमाच्या आणि घामाच्या जोरावर आईने लावलेला दिवा  घरभर प्रकाश देत राहतो सर्वांना उजळण्यासाठी ती मात्र स्वतः अंधारात राहते.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०