गोष्ट माझ्या आईची भाग -१५

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝दारासिंग विख्यात मल्ल.*            

  📔       *भाग - 15*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती अतबोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते गुणवंत कौर तिचे शिक्षण कमी होते.वडील व्यवसायानिमित्त बाहेर असायचे त्यामुळे आईचा सहवास मला अधिक लाभला.घरात खूप माणसे असायची त्यामुळे आई आमच्या वाट्याला कमी यायची.ती दिवसभर इतकी कामे करायची की तिच्या या परिश्रमातून आपण अखंड कार्यरत राहिले पाहिजे हा पहिला धडा मला तिथे मिळाला*.


*मला आजोबांनी अचानक दुसरीतून शाळेतून काढले तेव्हा मी खूप रडलो,माझ्या बरोबर आईही रडली, तिने खूप विनंती केल्यावर मला शाम सिंग नावाच्या संताकडे खाजगी शिकवणी लावली.आपल्या लेकाची थोडीफार शिकायची सोय झाली याचा तिला खूप आनंद झाला होता*.


*अठराव्या वर्षी मी सिंगापूरला गेलो.कुस्तीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.भारतात येऊन रुस्तुम-ए- हिंद झालो. कुस्ती या क्रीडा प्रकारात नाव कमावले.माझी हनुमानाची भूमिका अफाट लोकप्रिय झाली.मी इतके सारे यश मिळवले यात आईचा वाटा मोठा होता.ती कायम सांगायची माणुसकी आणि करुणा यांना कधीही गर्वाचा वारा लागू देवू नये*.


 *दारासिंग मोठे होताना त्यांना प्रत्येक ठिकाणी आईची मदत झाली.आई असतेच अशी मुलांसाठी तिला जन्मभर उन्हात नंदायची सवय असते.कितीही चटके बसले तरी ती सोसत राहते मुलांसाठी कायमची*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०