गोष्ट माझ्या आईची भाग २३

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 ई.श्रीधरन कोकण रेल्वे माजी चेअरमन.*            

  📔       *भाग - 23*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*केरळ राज्यातील पालघाड तालुक्यातील छोट्याशा गावात माझा जन्म झाला.आम्ही सात भावंडे होतो.त्यावेळी रेल्वेत कामाला असणे यात खूप मान सन्मान होता.माझ्या आईची इच्छा होती मी रेल्वेत इंजिनिअर व्हावे.ती मी प्रचंड अभ्यास करून पूर्ण केली.आमच्या गावात शाळा नव्हती तरी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील शाळेत मी शिक्षण घेतले*.


*आपण कितीही मोठे झाले तरी साधेपणाने जगावे हा माझ्यावर आईने माझ्यावर केलेला संस्कार कायम राहिला.मी मध्य रेल्वेतून सरव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालो तेव्हा माझ्याकडे स्वतःचे घर नव्हते.मला कितीही पगार मिळाला तरी त्यातील थोडासाच मला खर्च करायला लागत असे.आईचा काटकसरीचा संस्कार माझ्या मनावर आयुष्यभर बिंबला गेला*.


*श्रध्देने कोणतेही काम हाती घेतले,फळाची अपेक्षा न ठेवता आपण ते काम  केले की ते पूर्ण होतेच हा संस्कार आईचाच.यामुळेच भौगलिकदृष्ट्या अशक्य वाटणारा कोकण रेल्वेचा प्रकल्प मी यशस्वी केला.त्याचे उद्घाटन होताना मी तेथे कुठेच नव्हतो,कारण मी अशक्य वाटणारे दिल्ली मेट्रोचे काम हाती घेतले होते*.


*आई नेहमी म्हणायची "आपले आयुष्य ईश्वराच्या हाती आहे. तोच आपल्याला तारतो किंवा मारतो.आपल्या गरजा शक्यतो कमी ठेवाव्यात.काटकसरीने जगावे, आनंदी राहावे.कोणतेही काम परमेश्वराची पूजा म्हणून करावे."अशा श्रध्देने ती आयुष्यभर जगली आणि तोच संस्कार तिने आमच्यावर केला.मी इतक्या मोठ्या पदावर काम केले पण आईची शिकवण कधीच आचरणातून बाजूला जावू दिली नाही*.


*आई मुलांसाठी तिच्या आयुष्याचे कितीही काटेरी रान असले तरी तुडवत राहते जन्मभर.कधीच तक्रार करत नाही ती तिच्या पायाच्या भळभळत्या जखमांची*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०