गोष्ट माझ्या आईची भाग- १८
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 अच्युत गोडबोले-संगणक तज्ञ व लेखक.*
📔 *भाग - १८*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*श्रीमंत कुटुंबात जन्म झालेल्या माझ्या आईचे नाव होते लीला.घरी इतकी समृध्दी असून सुद्धा लग्नानंतर ३००चौरस फूट घरात तिने अतिशय आनंदाने संसार केला.आहे त्या परिस्थितीत ही आनंदाने जगता आले पाहिजे हा पहिला संस्कार तिने माझ्यावर केला*.
*प्रत्येकाला परमेश्वर ज्याच्या त्याच्या हिशोबाचे देत असतो त्यामुळे कुणाचाही हेवा करू नये.आपले यश आणि कर्तृत्त्व सतत वाढते ठेवावे*
*लहानपणी माझ्या खोडकर स्वभावाला तिने कधीही मुरड घातली नाही.खेळणे,उनाडक्या करणे असे सारे करताना मी अभ्यास फार कमी करायचो.मी एकपाठी होतो.एकदा वाचले की माझ्या सगळे लक्षात राहत असे.मित्रांच्या आई एकत्र आल्यावर आपल्या मुलांची स्वप्न एकमेकींना सांगायच्या.आई म्हणायची "त्याला पाहिजे ते तो होईल" तेव्हा मला खूप आईचा अभिमान वाटायचा. अशी आई मिळायला सुद्धा भाग्य लागते.ती म्हणायची"तुला हवे ते कर पण जे करशील ते अव्वल कर."आयुष्यातील कठिण प्रसंगाला कसे सामोरे जायचे याचा वस्तुपाठ तिने आम्ही सिंगापूरला फिरायला गेलो तेव्हा घालून दिला.आमचे तेरा हजार डॉलर चोरी झाले तरी ती डगमगली नाही यातून तिने मार्ग काढला*.
*तिने कधीही शिक्षा करून आम्हाला शिस्त लावली नाही.तिने अतिशय उत्तम सवयी आम्हाला लावल्या. त्या सवयी कधी नकळत तर कधी सहजतेने लागल्या गेल्या. अच्युत गोडबोले इतके महान झाले यात, कठिण परिस्थितीत न डगमगता परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या आईचा वाटा मोठा होता*.
*काडी काडी जमा करून आई लेकरांसाठी घरटे बांधते.आईचा एक हुंकार प्रेरणा देतो त्याला.आई कुठेही गेली तरी मूल जगत असते आईच्या पुढच्या हुंकारासाठी आणि प्रेरणेसाठी*.
Comments
Post a Comment