गोष्ट माझ्या आईची भाग २४
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 संजीव कपूर-प्रसिद्ध शेफ.*
📔 *भाग - २४*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते उर्मिला.वडील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कामाला असल्यामुळे त्यांची नोकरी कायमची फिरतीची होती.त्यामुळे माझे शिक्षण अनेक ठिकाणी झाले.माझी आई स्वयंपाक करत असताना मी स्वयंपाकघरात सारखी लुडबुड करत असे.पण यावरून आई मला कधीच रागावलेली आठवत नाही.घरात जर चिकन बनवायचे असेल तर ते बाबा बनवत असे.माझे बाबाही उत्तम आचारी होते.आईने स्वयंपाक करताना अनेक गोष्टी स्वानुभवतून मला करून दिल्या.माझी रोटी कधीच सरळ येत नसे,मग मी ती कात्रीने गोल करत असे*.
*आईने कोणतीही गोष्ट आमच्यावर लादली नाही.प्रत्येक चांगल्या गोष्टीला स्वातंत्र्य दिले.अभ्यासात मी प्रचंड हुशार होतो.एकदा वाचूनही माझ्या सगळे लक्षात राहत असे.मी कायम पहिल्या तीन क्रमांकात असे.मी मेरिट मध्ये आलो.सगळ्यांना वाटले मी डॉक्टर,इंजिनिअर होईल पण मी पाककृतीचे क्षेत्र निवडले.अनेक नातेवाईक आईला म्हणायचे मुलाला दुसरे क्षेत्र निवडायला सांगा.पण आईने माझ्या निवडलेल्या क्षेत्राला पूर्ण पाठिंबा दिला*.
*मी भारतातीलच नाही तर जगातील उत्तम शेफ झालो यामागे आई, वडिलांचे मला पूर्ण पाठबळ होते.मी या क्षेत्रात मोठा झालो मला इतका आत्मविश्वास आला तो आईने केलेल्या लहानपणीच्या संस्कारामुळे*.
*आई तळत, मळत,रांधत राहते आयुष्य आहे तोपर्यंत.याबदल्यात आईला कुणी पुरस्कार द्यावा अशी अपेक्षा कधीच नसतेच तिची.फक्त केलेल्या अपार कष्टाची जाणीव कुणाला तरी असावी इतकीच माफक अपेक्षा असते तिची*.
Comments
Post a Comment