गोष्ट माझ्या आईची भाग २६

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 प्रवीण दवणे प्रसिद्ध लेखक व कवी .*            

  📔       *भाग - 26*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते मंगला.माझे वडील जिल्हा परिषद बांधकाम विभागात कामाला होते.असे असले तरी आईला चुकीच्या मार्गाने घरात आलेला पैसा मान्य नव्हता.एकदा वडिलांना वरिष्ठांनी शंभर रुपये दिले होते तेही आईने पुण्याच्या संस्थेला निनावी दान देवून  टाकले.यातून कष्टाच्या कमाईचा संस्कार माझ्यावर नकळत झाला*.


*एक प्रसंग आठवतो वडिलांचा एकदा चार महिने पगार झाला नव्हता.एक दुकानदार होता तो फक्त ज्वारीचे पीठ उधार देत असे.दुधात याच पिठाची भाकरी कुस्करुन आम्ही खात असे.शेजारी कोणाकडे जावे त्यांच्याकडून एखादा पदार्थ मागावा असे आमच्या पैकी कोणालाही त्यावेळी वाटले नाही.कोणत्याही परिस्थितीत कोणापुढेही हात न पसरता आनंदाने कसे जगावे हे तिने कृतीतून शिकवले*.


*एकदा आमच्या घरी आकाशवाणीचे साहेब आले होते. घरात दोनच चमचे साखर होती आईने त्यांना त्या साखरेचा एक कप आणि मला गुळाचा चहाचा वेगळा कप दिला. यातून अतिथी धर्म नकळत कसा निभावला जातो हा संस्कार तिने आमच्यावर केला*.


*एकदा एका लग्नात मी आईबरोबर गेलो होतो.तिच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता.नात्यातील लोकांनी तिला याबद्दल हटकले तेथे तिचा स्वाभिमानी बाणा दिसून आला. ती म्हणाली"तुम्ही मला लग्नाला बोलावले आहे की दागिने पहायला.जर माझी लाज वाटत असेल तर आल्या पावली मी परत जाते.आणि दागिनाच   पहायचा असेल तर हा पहा माझा प्रवीण माझा खरा दागिना आहे".आईच्या या करारी स्वभावाचा मला पुढील वाटचालीस खूप फायदा झाला.मी तसाच करारी,स्वाभिमानी पद्धतीने जीवन जगलो आहे*.


*जगातील प्रत्येक आई स्वतःला तव्यावरील पोळीसारखी परतत असते.एकमेकींना सुखदुःख सांगत असते. दिलासा देत राहते.रोज नवे काहीतरी सोसण्याचे बळ देत रहाते.कारण ती आई असते.तहानभूक विसरून झिजत असते ती मुलांसाठी आयुष्यभर*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०