गोष्ट माझ्या आईची भाग- ६

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝किशोर कुमार .*            

  📔       *भाग - 6*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझा जन्म मध्यप्रदेशातील खंडवा या शहरामध्ये झाला.माझ्या आईचे नाव होते गौरीदेवी.लहानपणी माझा स्वभाव व्रात्य व खोडकर होता.प्रत्येकाची नक्कल त्याच्या तोंडावर करणे.मित्रांच्या खोड्या काढणे हा माझा नेहमीचा उद्योग होता.अन्य गोष्टीत माझे मन रमत नव्हते.हे आईच्या लक्षात आले तेव्हा तिने मला सांगितले"तुला आयुष्यात हवे ते कर ,पण ते मनापासून कर,त्यासाठी प्रचंड मेहनत घे"असे ती सांगायची.*

*मी प्रथम जिद्दी या चित्रपटात पार्श्व गायन केले चित्रपट हिट झाला पण माझे गाणे दुर्लक्षित झाले.मी निराश झालो होतो. आपल्याला गायक होता येणार नाही असे वाटू लागले अशा वेळी आईचे संस्कार आठवत असे"आयुष्य जेव्हा कसोटी घेते तेव्हा धैर्याने आपण त्या कसोटीला खरे उतरले पाहिजे".मी शांतपणे संधीची वाट प्रतीक्षा करीत राहिलो*.


*एके दिवशी मी के.एल.सैगल यांचे गीत मन लावून म्हणत होतो.त्याच वेळी प्रख्यात संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन तेथे आले त्यांनी मला सांगितले "देवाने तुला चांगला गळा दिला आहे.त्याचा वापर स्वतःच्या शैलीत गाणे गाण्यासाठी कर.कोणाची नक्कल करू नकोस."माझ्या आयुष्यात मी कधीही संगीताचे शिक्षण घेतले नाही.आवड आणि इच्छा शक्ती या दोनच गोष्टी माझ्याकडे होत्या.आणि तिसरी गोष्ट माझ्याकडे होती ती माझ्या आईचे वडिलांचे संस्कार*.


*किशोर कुमार यांनी गायलेली गाणी अजरामर झाली यात आईचा वाटा मोठा होता योग्य वेळी त्यांची आवड ओळखून  त्यांना त्या क्षेत्रात जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले.आई मुलाला ऊन लागू नये म्हणून त्याचे छप्पर होते.आई रान तुडवत रहाते आयुष्यावर मुलांच्या ओंजळीत फुले येण्यासाठी*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०