गोष्ट माझ्या आईची भाग-११

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝अभिनेते रमेश देव.*            

  📔       *भाग - ११*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते सुशिलाबाई.माझे वडील नामवंत वकील होते.राजश्री शाहू महाराजांचे ते कायदेशीर वकील होते.मी मोठा पोलिस अधिकारी व्हावे अशी आईची ईच्छा होती.मला मात्र नाटक ,सिनेमाची आवड होती.बाबुराव पेंटर,राजाभाऊ परांजपे असे कलावंत त्याप्रमाणे अनेक सिने कलावंत आमच्या घरी येत असे.अनेक नाटके,चित्रपट त्या काळी मी पहात होतो.यातून असे वाटायचे की आपणही कलावंत व्हावे*.


*मी हौस म्हणून नाटकात,करताना हिंदी चित्रपटातही भूमिका करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती मला म्हणाली"हे मायावी क्षेत्र आहे,त्यात अनेक व्यसनांचा भुलभुलैया आहे,याला तु बळी पडणार नाही याचे वचन दे."तेव्हा मी तिला वचन दिले होते"मी आयुष्यात कधीही मद्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही,तशी शपथ मी देतो."ती शपथ मी शेवटपर्यंत पाळली.अगदी सिनेमात तसे दृश्य असेल तरी मी ते टाळत असे*. 


*ज्यावेळी व्यवसायाची गरज म्हणून मी घराबाहेर पडलो.मुंबईला आलो तेव्हा ती मला म्हणाली"तू खूप वरती बघूनही चालू नको किंवा खाली बघूनही चालू नकोस. खूप वरती बघितले तर खालचा रस्ता दिसत नाही,ठेच लागते,माणूस खड्ड्यात पडतो.आणि खाली बघून चालले तर तुला नवनवीन क्षितिजे दिसणार नाही.एवढेच लक्षात ठेव."तो सल्ला मी कायम पाळला*.


*रमेश देव इतके मोठे अभिनेते झाले यात आईच्या त्यागाचा वाटा मोठा आहे.असे म्हणतात आईला खूप रडावेसे वाटले तरआपले अश्रू कोणाला दिसू नये म्हणून ती पावसात भिजत उभी राहते कारण ती आई असते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०