गोष्ट माझ्या आईची भाग २५
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 अजित वाडेकर प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू .*
📔 *भाग - २५*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझ्या आईचे नाव होते मनोरमा.माझे बालपण मुंबईत गेले.माझ्या लहानपणी मी आणि मित्र टेनिस बॉल वर गल्ली बोळात क्रिकेट खेळत असे.आम्ही मित्र एकत्र आलो की आम्ही एक रुपयावर मॅच खेळत असे.त्यासाठी प्रचंड चढाओढ लागत असे.अशा क्रिकेट सामन्यासाठी मी आईकडे पैसे मागितले तर ती मला कधीही नाही म्हणाली नाही. भरपूर खेळ भरपूर अभ्यास हे तिचे साधे सांगणे होते.खेळामुळे मेंदू ताजातवाना होतो म्हणून खेळ खेळायला हवा या मताची ती होती.मेरिट मध्ये आलो तेव्हा आई बाबांनी मला खूप महागडी बॅट भेट दिली होती*.
*माझे अधिक क्रिकेट बहरले ते मी कॉलेज मध्ये गेल्यावरच.माझ्या कॉलेजची वेळ खेळाशी मिळतीजुळती नव्हती.आईने मला सकाळ सत्राच्या कॉलेजला प्रवेश घ्यायला पूर्ण स्वातंत्र्य दिले.त्या काळी सामने खेळताना आपला खर्च आपणच करायचा असे.त्यासाठी माझी आई स्वतःची बचत करत असे*.
*मी भारतीय क्रिकेट टीम मध्ये खेळताना तिने खेळासाठी दिलेले पाठबळ मला प्रत्येक यशाच्या वेळी आठवत असे.माझा खेळ जेव्हा चांगला होत नसे तेव्हा मी निराश होत असे.पण आई सांगायची"खेळावर लक्ष दे जिंकण्यावर नाही,हा खेळच तुझे नाव मोठे करील"याच संस्कारामुळे मी क्रिकेट मध्ये इतके यश मिळवले*.
*रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आईची काही राहून गेलेली स्वप्न आई उराशी बाळगून असते.ती पूर्ण झालेली नसतात,आणि होणारही नसतात माहित असते तिला.पण ती जगत असते मुलांच्या स्वप्नांसाठी सारे अपुऱ्या स्वप्नांचे आभाळ कवेत घेवून*.
Comments
Post a Comment