गोष्ट माझ्या आईची भाग २९

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝 हेमा मालिनी प्रसिद्ध अभिनेत्री,नृत्यांगना .*            

  📔       *भाग - 29*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझी आई अम्मा हो आम्ही तिला अम्माच म्हणत असे.माझ्या प्रत्येक हालचालींवर तिचे बारीक लक्ष असे.तिनें या हालचालींना योग्य वळण लावले.आपली मुले मोठी झाली पाहिजे मग ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाली तरी चालतील अशी तिची प्रामाणिक भावना होती.म्हणूनच माझ्या नृत्य कलेला तिने पाठबळ दिले.माझ्या कामगिरीत सुधारणा झाली पाहिजे यासाठी ती कायम आग्रही असे*.


*आमच्या दृष्टीने आम्ही पाहिलेला प्रत्येक नृत्याचा कार्यक्रम आमच्यासाठी एक सुधारणेची संधी असे.कारण त्या कार्यक्रमातील नृत्याची माझ्या नृत्याशी तुलना करून अप्पा अम्माशी  चर्चा करत असे. वैजयंतीमालाच्या नृत्याबद्दल आमच्या घरात प्रचंड आदर होता.अम्मा तिला श्रेष्ठ कलावंत मानत असे*.


*मी इतकी यशस्वी अभिनेत्री झाले पण याची हवा माझ्या डोक्यात जाऊ नये म्हणून ती मला कधीही उत्तम काम झाले असे म्हणाली नाही.फक्त ठीक झाले इतकेच ती म्हणत असे.पण अम्माच्या त्या त्रोटक  शब्दातही प्रचंड प्रामाणिकपणा असे,त्यामुळे मी प्रचंड निश्चिंत होत असे.तिच्या दृष्टीने मी म्हणजे अनमोल रत्न होते.त्यासाठी माझे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तिने कुठेही कसर सोडली नाही.म्हणूनच माझी अम्मा माझ्यासाठी इतरांपेक्षा वेगळी आहे*.


*आईला सारे  काही उमगत जाते आपण काहीही न सांगता.मुलांच्या मनातील अगदी अंधाऱ्या रात्रीही येणारी शीळ ती अचूक ओळखते.ही कला आजपर्यंत आई सोडून जगाच्या पाठीवर कोणालाच अवगत नाही.कारण लेकराला आई शिवाय कोणाचाच इतका आधार आणि लळा नसतो*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०