गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग३४
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-34*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*त्याचे जीवन म्हणजे एक अखिल शोधयात्राच आहे.त्याचा जन्म 30 ऑक्टोबर 1909मध्ये मुंबई मध्ये झाला.आजोबा म्हैसूर संस्थेचे दिवाण तर वडील टाटा परिवारात अधिकारी होते.त्यामुळे विज्ञानाची ओढ त्याच्या घरातच होती.मुलांनी शिकावे आचार विचार संपादन करावे हेच घरातील संस्कार होते.तो लहान असताना त्याला निद्रानाश हा आजार झाला.खूप डॉक्टर केले पण गुण नव्हता.शेवटी एका युरोपीय डॉक्टरने सांगितले बालक महा बुद्धिमान आहे.बालक मोठे झाले की सगळे व्यवस्थित होईल.पुढे तो केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनिअर होतो.पुढे तो मुलगा भारताच्या अणूऊर्जा संशोधन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवतो आणि जगाला भारताची दखल घ्यायला लावतो.हे प्रशंसनीय काम करणारा तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ डॉ होमी भाभा*. 1930 सालची त्यांची विज्ञान व संशोधन पद्धती खुप गाजली.परदेशातील अडम्स, हप्किन पारितोषिक,न्यूटन शिष्यवृत्ती, हे तीनही पुरस्कार मिळवणारे होमी भाभा एकमेव विद्यार्थी होते.त्यांची पी.एच. डी झाली तेव्हा त्यांचे वय होते अवघे 25 वर्ष.भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे अध्यक्ष राहिलेल्या भाभा यांना अनेक विध्यापिठांच्या डॉक्टरेट मिळलेल्या आहे.भारत सरकारने त्यांचा पदमभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला।आहे. पंडित नेहरू व टाटा ट्रस्ट च्या सहयोगातून मुंबई येथे इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था उभी राहिली याचे सारे श्रेय भाभा यांचेच.तीन खोल्यात सुरू झालेली संस्था पुढे देशाला विज्ञानात उच्च स्थानावर नेणार आहे हे सांगूनही खरे वाटले नसते. *येथून पुढे जगभर वीज आणि इंधन तुटवडा पडेल.या संकटाचे निवारण करण्यासाठी अणूऊर्जेची दारे ठोठावणे हाच एक मार्ग आहे.नियंत्रित आणि विवेकी अणू ऊर्जेचा वापर जगाच्या भाग्योदयाचा राजमार्ग आहे हे भाभा यांनी त्यांचा प्रतिभेने आधीच सांगून ठेवले आहे.त्यांच्याच परीश्रमातून भारतात अनुभट्टीची स्थापना झाली. प्रचंड बुद्धिमान असणारे भाभा यांचे जीवन आपल्याला आशावादी जगायला प्रेरणा तर देतेच शिवाय आहे त्या सुविधा वापरून यश मिळवता येते हा संदेशही देते.*

Comments
Post a Comment