गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - २९
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-29*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*मद्रास प्रांतातील तंजावर मधील एरोड या गावी त्याचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला.घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची.वडील के श्रीनिवास कापड दुकानात सेल्समन तर आई कोमलताम्मा गृहिणी.तो पैशाने श्रीमंत नसला तरी जन्मापासून ज्ञानाने प्रचंड श्रीमंत होता. शाळेत असताना त्याची स्मरणशक्ती इतकी अफाट होती की 7 व्या वर्षी तो गणिताची विविध प्रमेय,सिद्धांत तोंडपाठ सांगत असे.हे पाहून शिक्षकही चकित होत.त्याने शाळेचे अभ्यासक्रम अत्यंत कमी वयात पूर्ण केले.पुढे हा मुलगा गणित या विषयात इतका प्रसिद्ध झाला की त्याने गणिताची हजारो प्रमेय मांडली.लोक त्याला आधुनिक भास्कराचार्य म्हणू लागली. तो महान गणिततज्ञ म्हणजे श्रीनिवास रामानुजन आयंगार*
रामानुजन यांनी 3500 पेक्षा जास्त गणिती प्रमेय मांडली.ते आजारी असतानाही सुमारे 600 प्रमेय त्यांनी मांडली. रामानुजन मूळ संख्या,रामानुजन थिटा फंक्शन,राउंड नंबर्स बद्दलचे त्यांचे संशोधन, डग्लस रामानुजन आयडेंटिटी, बीज गणित सिद्धांत,हे सारे गणितातील योगदान रामानुजन यांचेच.केम्ब्रिज विद्यापीठ लंडन रॉयल सोसायटीचे फेलो शिप बहाल केलेले एकमेव भारतीय गणिती म्हणजे रामानुजन हे आहेत.
*रामानुजन यांची भाषणे व संशोधन यावर प्रकाशित झालेला 600 पानी ग्रंथ म्हणजे जणू त्यांचे स्मारकच होय.गणित आवडते म्हणून इतर विषयात बारावीला नापास झालेला हा माणूस एका विषयाचा ध्यास घेऊन इतका मोठा होतो की The Man Who Knew Infinity हा चित्रपट त्यांच्या जीवनावर निघतो. त्या काळी कागद महाग असल्यामुळे ते पाटीवर गणिते सोडवत असे.महिना 25 रुपये पगारावर कारकून म्हणून काम करणाऱ्या या माणसाच्या आयुष्यात हेराल्ड हार्डी हा गणिततज्ञ गॉडफादर बनून आला आणि त्यांच्या ज्ञानाला झळाळी मिळाली.यावरून हेच लक्षात येते आपल्याही आयुष्यात अशी एखादी संधी येते जी आपल्या आयुष्याचा पट बदलून टाकते.फक्त त्या संधीचे यशात रूपांतर करण्याची जिद्द अंगात असायला हवी*

Comments
Post a Comment