गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-37*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*15 मार्च 1959 रोजी मुंबईतील गिरगाव मधील एका इमारतीच्या छतावर सात महिला एकत्र येतात. घरातील काम सांभाळून इतर काहीतरी काम करावे हा त्यांचा एकत्र येण्याचा उद्देश असतो.मग त्या एक व्यवसाय सुरू करतात. त्यांची पहिल्या दिवसाची पहिली कमाई होती 50 पैसे.मग पुढे तो व्यवसाय वाढत जातो.7 महिला काम करणारा उद्योग 45000 हजार महिला कामगारांचा होतो.सुरवातीला कर्जाऊ घेतलेल्या 80 रुपये भांडवलाचा उद्योग सोळाशे कोटीचा होतो.ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा तो उद्योग म्हणजे श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड .*.
या उद्योगाचे वैशिष्ट्ये म्हणजे नुकसान व नफ्यात सर्व महिलांची सामूहिक जबाबदारी असते.महिलाच सहमालक असणारा जगातील एकमेव उद्योग म्हणजे लिज्जत पापड उद्योग. धर्मदाय संस्थेप्रमाणे हा उद्योग काम करतो ही उत्पादक कंपनी नाही.छगनलाल पारेख व पुरषोत्तम दामोदर यांनी सुरवातीपासून या उद्योगाला पाठिंबा दिला. .महिलांना कमीत कमी पाच किलो तयार पापड पीठ दिले जाते.त्यांनी त्याचे पापड बनवून ते सुकवून आणून द्यायचे. घरीच बसून काम करायचे.यासाठीचे प्रशिक्षण व साहित्य खर्च उद्योग संस्था देते.पापड बनवणाऱ्या महिलांच्या घरी सुपरवायझर महिला अचानक भेट देऊन मालाचा दर्जा व स्वच्छता यावर देखरेख ठेवतात.पापड द्यायचे परत पीठ व पैसे रोख घेऊन जायचे.सगळा व्यवहार रोखीचा,उधारी नाही त्यामुळे उद्योग कायम नफ्यात राहिला आहे.सर्व महिला सदस्य असणाऱ्या उद्योगात 21 प्रतिनिधी महिलांचे संचालक मंडळ आहे.ते देशात 81 शाखा चालवते.ज्या महिला पापड बनवण्यात आघाडी घेतात त्यांना सोन्याची नाणी उद्योगाकडून भेट म्हणून दिली जातात.पापड बनवणाऱ्या महिलांना कंपनी लिज्जत सिस्टर नावाने ओळखले जाते.
*फक्त महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा उद्योग पापडा बरोबर साबण,कपडे धुण्याची पावडर,मिरची,मसाले,चपाती यासारखीही उत्पादने तयार करतो.या उद्योगात कुणी एक मालक नसला तरी पदमश्री पुरस्कार प्राप्त जास्वंतीबेन पोपट,पार्वतीबेन थोडानी,उजमबेन कुंडलीया,बानूबेन तन्ना,लागूबेन गोकानी, जयाबेन विठलानी,अन्य एक महिला या सुरुवातीच्या सात महिलांनासह हजारो सहकारी महिलांमुळे हा गृहउद्योग जवळपास करोडो पापड तयार करतो. त्यातील 80 करोड पापड परदेशात निर्यात केले जातात.लिज्जत पापडाचे वैशिष्ट्ये म्हणजे या करोडो पापडांची असणारी चव एकसारखीच असते.अगदी सहज म्हणून एकत्र आलेल्या महिलांनी छोटा असणारा व्यवसाय उभा केला.आणि त्यांनी हे दाखवून दिले की सचोटी,प्रामाणिकपणा,कोणतेही कष्ट उपसण्याची तयारी,सहनशीलता,कमालीची जिद्द या साऱ्या गुणांमुळे महिला उद्योगातच नाही तर कोणत्याही क्षेत्रात मोठ्या होतात*.

Comments
Post a Comment