गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -२७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-27*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*जर्मनीतील वूटेनबर्ग मधील उल्म येथे त्याचा जन्म 14 मार्च 1879मध्ये झाला.त्याचे वडील हर्मन इंजिनिअर तर आई पौलिन गृहिणी.लहानपणी तो स्वभावाने बुजरा ,हळवा होता.त्याला बोलण्याचा त्रास होत असे त्यामुळे तो न बोलणेच पसंत करत असे.शाळेतील कडक शिस्त,घोकंपट्टी,त्याला आवडत नसे.त्याला वर्गातील ढ विद्यार्थी म्हणून चिडवले जात असे.पण हे खरे नव्हते,प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजावून घेणे हा त्याचा स्वभाव त्याला शांत बसू देत नव्हता.यामुळे तो बालपणीच गणिती झाला.ज्या मुलाला बौद्धिक विकलांग ठरवण्यात आले होते, पुढे त्या मुलाने जगात असे काही शोध लावले की जगातील प्रतिष्ठेचा भौतिकशास्राचा नोबेल पुरस्कार देऊन त्या मुलाचा सन्मान केला गेला.तो मुलगा म्हणजे जगातील महान शास्त्रज्ञ अलबर्ट आइनस्टाईन*
जगाला अनेक शोधांची देणगी देणाऱ्या अलबर्ट यांना नोबेल पारितोषिका बरोबर,मत्तयुक्की पदक,कोपले पदक,मैक्स प्लॉक पदक.असे त्या त्या देशांचे मानाचे सन्मान मिळाले. शतकातील महान व्यक्तीमत्व हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.त्यांनी शोधलेल्या प्रकाशाचा पुंज या सिद्धांतावरच दूरदर्शनचा शोध लागला.वस्तुमान आणि उर्जा यांच्यात एक सूत्र त्यांनी बनवले. रेफ्रिजरेटरचा आणि आकाशाचा रंग निळा असतो हे त्यांचेच शोध.वेग आणि वेळ यांचा मेळ घालणारा त्यांचा सापेक्षवादाचा सिद्धांत जग बदलवणारा ठरला.
*300 पेक्षा अधिक वैज्ञानिक शोधनिबंध,150 पेक्षा अधिक गैर वैज्ञानिक निबंध लिहिणारा हा महान शास्त्रज्ञ बेल्जियमच्या राणीने भेटायला बोलावल्यावर स्वागतासाठी वाहने व अधिकारी सज्ज असतानाही एका हातात सुटकेस व त्यांना उत्तम वाजवता येणारे व्हायोलिन ,दुसऱ्या हातात घेऊन राजवाड्यापर्यंत चालत जातो.विचारांची सधनता लाभलेला,कमालीचा हळवा, लहान मुलांवर प्रचंड प्रेम करणारा,हा माणूस आयुष्यात अनेक वेळा अपयशी होऊनही परत उभा राहिला. त्यांचे जीवन आपल्याला हेच सांगत राहते श्रेष्ठता वेगळी कृती नाही ती एक सवय आहे. ती सवय लागली की जगाला आपली दखल घ्यावी लागते*.

Comments
Post a Comment