गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १८

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-18*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*कर्नाटक राज्यातील कोलार मधील मुद्देनहळ्ळी या लहानशा खेड्यात त्याचा जन्म  15 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.  त्याचे वडील श्रीनिवास संस्कृतचे पंडित तर आई व्यंकटलक्ष्मन अम्मा गृहिणी.15 व्या वर्षी त्याचे पितृछत्र हरपले. मग त्याची आर्थिक परिस्थिती खुप खालावली.मामाच्या घरी राहून तो पाच किलोमीटर महाविद्यालयात जात असे ,तेथून परत स्वतःचा खर्च  भागावा म्हणून परत 4 किलोमीटर पायी शिकवणी घ्यायला जात असे.अशा कठिण परिस्थितीत तो एल. सी.ई व एफ. सी. ई  म्हणजे आताची बी ई परीक्षा उत्तीर्ण झाला.मग अभियंता म्हणून काम करताना साऱ्या भारताला त्याने धरणावरील न गंजणाऱ्या  स्वयंचलित दरवाज्यांची देणगी दिली. ती महान व्यक्ती म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.*   

           

धरणाचे पाणी पावसाने जास्त झाले की  त्याचे फार नुकसान होत असे.अशावेळी धरणाची उंची वाढवणे शक्य नसे मग यावर उपाय म्हणून मोक्षगुंडम यांनी न गंजणारे स्वयंचलित दरवाज्यांचे आराखडे ,प्रारूप स्वतः बनवले आणि त्या दरवाज्यांचा पहिला यशस्वी प्रयोग पुणे येथील मुठा नदीवरील खडकवासला धरणावर केला.पुढे हेच तंत्र अनेक धरणात वापरले.आज असे *धरणावरील गेट विश्वेश्वरय्या गेट* नावाने ओळखले जातात. यामुळे पूर नियंत्रण तर झालेच शिवाय शेतीची  सिंचन क्षमता ही वाढली .शेतातील खरीप ,रब्बी पिके हि त्यांचीच संकल्पना.            त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना त्यावेळी इंग्रज सरकारने नाईट कमांडर,भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर भारतरत्न हा सन्मान देऊन गौरव केला.    

                   *

*अत्यंत हलाकीत शिक्षण झालेल्या या महान व्यक्तीने 28 हून अधिक पुस्तके लिहली.15 सप्टेंबर हा दिवस त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ  अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.त्यांच्या नावाने अनेक संस्था कर्नाटकात निघाल्या.त्या काळातील कावेरी नदीवरील कृष्णसागर नावाच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या धरणाची देखभाल करणारा हा माणूस इतका बुद्धीमान असूनही अगदी साधेपणाने जगला.आयुष्याचा लढा तो लढत राहिला. दुःखावर स्वार होऊन नवी स्वप्ने पूर्ण करत राहिला न थकता ना थांबता.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०