गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-35*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*महाराष्ट्र राज्यातील वर्धा हे त्याचे गाव.23सप्टेंबर 1950 मध्ये त्याचा जन्म झाला.वडील ठाकुरदास व आई सुमन दोघेही गांधीवादी विचारांचे.गांधीजींच्या 'नई तालीम' या शिक्षण पद्धती मध्ये त्याचे शिक्षण सेवाग्राम आश्रमात झाले.त्यामुळे समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हे चिरकाल टिकणारे संस्कार त्याच्यात येथेच रुजले गेले.पुढे तो एम.बी.बी.एस झाला .तेथे त्याने तीन विषयात सुवर्णपदके मिळवली.सार्वजनिक आरोग्य, या विषयाचे शिक्षण देणारी एकही शिक्षण संस्था त्याला सापडली नाही.मग तो मुलगा आरोग्य शिक्षणाचा ध्यास घेतो.गडचिरोली सारख्या दुर्गम भागात 'सर्च ' अर्थात 'शोधाग्राम' संस्थेच्या माध्यामातून बालकांच्या मृत्यूची कारणे,यावर असे काही काम उभे करतो की, सारे जग त्याच्या समाज कार्याची दखल घेते.हे काम करणारा तो मुलगा म्हणजे डॉक्टर.अभय ठाकुरदास बंग*
*त्यांच्या याच कार्याची दखल म्हणून त्यांना पदमश्री,महाराष्ट्र भूषण, द कपल ऑफ इयर,बिल मेलिंडा गेट्स,यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले.टिळक व आरोग्य विज्ञान विद्यापीठांनी त्यांचा डी. लीट देऊन सन्मान केला आहे*.
अर्भकांच्या मृत्युवर त्यांनी लिहलेला 'कोवळी पानगळ' हा शोध प्रबंध जागतिक आरोग्य संघटनेला आपले आरोग्य धोरण बदलायला लावणारा ठरला.त्यांनी रोजगार हमी योजनेची मजुरी 4 रुपये नसून 12 रुपये हे पटवून देऊन सरकारला मान्य करायला लावले.गडचिरोली मध्ये त्या काळी अशक्य वाटणारी दारूबंदी करून दाखवली.नवजात बालकांच्या श्वासाची वारंवारता मोजणारे ' ब्रेथ काउंटर ' उपकरण शोधणारे डॉक्टर न्यूमोनिया व कुपोषण हे बाल मृत्यूचे सर्वात मोठे कारण सांगतात.त्यांच्या या साऱ्या यशात प्रेमविवाह करून जिद्दीने त्यांच्या कामाला साथ देणाऱ्या पत्नी डॉ. राणी बंग यांचा वाटा खुप मोठा आहे.
*जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात शिकलेले, अनेक विषयांची सुवर्णपदके जिंकलेले डॉक्टर श्रीमंती,शहरी व आरामशीर,जीवनशैली सोडून आदिवासी समाजासाठी जणू आरोग्य देवदूत आहेत.डॉक्टर कायम सांगतात तुमच्या डोक्यातले प्रश्न घेऊन लोकांमध्ये जाऊ नका.त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवायचा प्रयत्न करा.डॉक्टरांनी हेच केले .म्हणून त्यांनी समाज मनाचा आरसा होऊन समाजाला एक समाजसेवेची वेगळी वाट दाखवली कधीही न संपणारी.*

Comments
Post a Comment