गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-३१

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-31*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*भारतावर इंग्रज सरकाची सत्ता होती.त्यावेळी विदेशातील अनेक पदार्थ भारतात मिळत असे.त्यात त्या काळची कँडी प्रसिद्ध होती.फक्त इंग्रज अधिकारीच ती खात असे.त्याची किंमत भारतीयांना परवडत नसे.एका मुलाला ही गोष्ट मनाला फार लागते.तो भारतात स्वदेशी कँडी  बनली पाहिजे म्हणून जर्मनीला जातो. तेथे कँडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतो.भारतात येतो ते कँडी बनवण्याचे 60 हजाराचे मशीन घेऊनच.1929 साली मुंबई मधील विले पारले येथे तो जुना कारखाना विकत घेतो.कँडी बनवायला सुरुवात करतो.पुढे1939मध्ये ती कंपनी बिस्किटे बनवते.ती बिस्किटे इतकी लोकप्रिय होतात की जगात सर्वात जास्त बिस्किटे विकणारी कंपनी बनते.6 मिलियन स्टोअर मध्ये ती बिस्किटे विकली जातात.16 मिलियन पेक्षा अधिक तिचे उत्पन्न होते. ती कंपनी म्हणजे पारले जी.आणि ती सुरू करणारा तो मुलगा म्हणजे मोहनलाल दयाळ*.                                      


महात्मा गांधींच्या स्वदेशी विचारांनी प्रेरित होऊन सुरू झालेल्या पारले कंपनीचे नाव ती जेथे सुरू झाली त्या ठिकाणचे ठेवले आहे.सुरवातीला 12 कर्मचारी काम करणाऱ्या या कंपनीत आज हजारो लोक काम करतात.1939 मध्ये सुरू झालेल्या बिस्कीटाचे सुरवातीचे नाव पारले ग्लुको असे होते. ते1982 मध्ये बदलून पारले जी केले.            


*रेशीम चा व्यापार करणारे मोहनलाल त्यांच्या व्यवसायात सुखी होते पण स्वदेशीच्या वेडापायी एक कंपनी स्थापन झाली आणि ती 2003 साली जगातील सर्वात जास्त बिस्कीट विकणारी कंपनी बनली.2012साली पाच हजार कोटींची विक्रमी बिस्किटे विक्री करणारी पारले एकमेव कंपनी होती.80 वर्षात झाली नाही इतकी विक्री लोकांची भूक भागवण्यासाठी कोरोना  लॉकडाऊन काळात  पारले बिस्कीटाची झाली.दरवर्षी सरासरी 14 हजार करोड बिस्किटे संपणाऱ्या पारले कंपनीचा भारतीय बिस्कीट बाजारात 70 टक्के वाटा आहे.दर पाच मिनिटाला सरासरी 5000 हजार पेक्षा जास्त लोक हे बिस्कीट खातात.यात सर्वात जास्त 5 रुपये किंमतीचे बिस्कीट संपतात*.


*आज इतर उत्पादनातही आघाडीवर असणारा पारले उद्योग समूहाची मूळ ओळख पारले बिस्कीट हिच आहे. इंग्रजांपेक्षा स्वस्त कँडी व बिस्कीट भारतीयांना मी खायला देईल या एकाच जिद्दीने मोहनलाल यांनी इतके मोठे अफाट व्यवसाय साम्राज्य उभे केले.त्याचे जीवन आपल्याला पदोपदी हाच संदेश देते धोका पत्करल्या शिवाय कोणताही व्यवसाय अथवा माणूस मोठा होत नाही*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०