गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ३०
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-30*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*गुजरात राज्यातील मेहसाणा येथे त्याचा जन्म 13 एप्रिल1944 मध्ये झाला.त्याचे वडील खोडीदास पटेल हे शेतकरी होते.शेतकरी कुटूंब असूनही तो आपले बी एस्सी केमिस्ट्री पर्यंत तो आपले शिक्षण पूर्ण करतो.पुढे त्याला गुजरात सरकारच्या गौण खनिज विभागात सरकारी नोकरी मिळते.विज्ञान शाखेतून शिक्षण असल्यामुळे रासायनि प्रक्रियांचे चांगले ज्ञान त्याला होते.यातून तो सुमारे तीन वर्षे मेहनत घेऊन अतिशय स्वस्त अशी कपड्याची पावडर बनवतो.पुढे ती कपड्याची पावडर भारतातच नाही तर जगात सर्वत्र विकली जाते.त्याची पावडर बनवणारी कंपनी इतकी मोठी होते की त्यात 18000 हजार कामगार काम करतात.कपड्याची पावडर बनवणारी ती कंपनी म्हणजे निरमा.आणि ही कंपनी स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे करसनभाई पटेल*. पटेल यांना पावडरचा फॉर्म्युला सापडल्यावर त्यांनी आपल्या लाडक्या मुलीचे नाव याला दिले.तिचे नाव निरुपमा पण सगळे तिला लाडाने निरमा म्हणत.सुरवातीला घरात सुरू झालेला हा व्यवसाय पुढे हजारो कोटींचा झाला.सरकारी नोकरी सोडून करसनभाई जेव्हा या व्यवसायात उतरले तेव्हा सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढले होते.पण आज देशात पावडर वापरात 35 टक्के वाटा निरमा चा आहे.सुरुवातीला या पावडरची किंमत एक किलोला 3 रुपये 50 पैसे होती.त्यावेळी इतर पावडर 15 रुपये किलोने मिळत असे.त्यामुळे उच्च गुणवत्ता कमी किंमत असणारी निरमा पावडर देशभरात प्रचंड लोकप्रिय झाली.वॉशिंग पावडर निरमा दूध सी सफेदी निरमा से आई या जाहिरातीने ही लोकप्रियता शिखरावर पोहचली. कपड्याच्या पावडरचा प्रवास पुढे शांपू,साबण, टूथपेस्ट, मीठ इथपर्यंत जाऊन पोहचला. *करसन भाई यांना भारतातील उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट गुजराती व्यावसायिक पुरस्कार मिळाले.सुरवातीला निरमा पावडर पुड्यावर मुलीचा फोटो नव्हता.पण करसनभाई यांच्या मुलीची आठवण कायम रहावी म्हणून पुड्यावर तिचा फोटो छापला जाऊ लागला.करसन भाई यांचा सायकलवरून पावडर विकायचा सुरू झालेला प्रवास स्वतःच्या खाजगी हेलिकॉप्टर पर्यंत येऊन पोहचला.करसनभाई यांच्या जीवनाकडे पहाताना प्रचंड आत्मविश्वास, मेहनत, स्वतःवर प्रगाढ श्रद्धा हीच यशाची रहस्ये आहेत हे समजते*

Comments
Post a Comment