गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- १६
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-16*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*फ्रान्सच्या कुपर्व नामक खेड्यात त्याचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला.वडील सायमन कातडी माल तयार करणारे कारागीर. तर आई शेतकऱ्याची मुलगी.दोन बहिणी आणि एक भावाच्या नंतर याचा जन्म.त्यामुळे तो घरात सर्वांचा लाडका होता.एक दिवस वडिलांच्या वर्कशॉप मध्ये गेल्यावर त्यांची काम करणारी अरी त्याने सहज हातात घेतली.वडीलांप्रमाणे ती तो चालवायला गेला आणि ती डोळ्यात घुसली.डॉक्टरांनी खुप प्रयत्न केले डोळ्यावर उपचार झाले पण काही दिवसांनी त्या डोळ्याला झालेला संसर्ग दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला.त्याचे दोन्हीही डोळे काढून टाकावे लागले.तरीही तो डगमगला नाही.मोठे होऊन त्याने स्वतः अंध असूनही अंधांना वाचता येईल अशीजगप्रसिद्ध 'ब्रेल ' लिपी बनवली.तो मुलगा म्हणजे ब्रेल लिपीचा निर्माता लुई सायमन ब्रेल*
या लिपी द्वारे अंध मनुष्य हातांच्या बोटांनी उठाव टिंबाना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकतो.एक सटात 6 बिंदूची रचना असते.बोटांच्या पेराने अंध व्यक्ती एका ओळीत किती अक्षरे आहे हे ओळखू शकतो.सुरुवातीला त्याची ही लिपी मान्य झाली नाही पण त्याने हार न मानता कार्य चालू ठेवले.त्याचेच फळ म्हणून जगाला एक दिवस त्याच्या लिपीची दखल घ्यावी लागली.पुढे ती जगतमान्य झाली.
*या लिपीने अंधांना डोळस माणसाप्रमाणे लिहते वाचते केले.लुई ने शेक्सपिअर काही नाटके,इतर साहित्यकृती या पद्धतीने लिहली*.
*आंधळ्या लुई ने आपल्या उठावदार सहा टिंबांनी सर्व जगातील अंधांचा ज्ञानमार्ग सोपा केला.सततच्या अविरत परिश्रमाने त्याला हे शक्य झाले.अंध असतानाही लुई पराकोटीचे समर्पित जीवन जगाला.लुईकडून आपण डोळस माणसांनी इतकेच शिकायचे परिश्रमाला जर धाडसाची जोड दिली तर माणूस चमत्कार करू शकतो.एखादे काम करू की नको यामध्ये कोणतेच प्रयत्न नसतात.शेवटी तुमचा आत्मविश्वास च तुम्हाला यशस्वी बनवू शकतो.*

Comments
Post a Comment