जिद्दी माणसांच्या भाग - २३
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-23*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*मध्यप्रदेश राज्यातील इंदौर मध्ये तिचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.गायक असणाऱ्या वडिलांनी,आणि गृहिणी असणाऱ्या आईने तिच्यासह सर्व भावंडावर उत्तम संस्कार केले.तिच्यासह चार बहिणी ,एक भाऊ असे मोठे कुटूंब.तिच्या वडिलांचे गायक आणि नाटकाची आवड यामुळे कुटूंबाचा गाडा चालत होता.पुढे ते कुटुंब महाराष्ट्रात आले.ती 13 वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन होते.ती घरात सगळ्यात मोठी असते.लहान भावंडांची सगळी जबादारी तिच्यावर येते.वडिलांनी शिकवलेले गाणे हाच तिच्यासाठी कुटूंब चालवण्याचा पर्याय असतो.ती कोलमडून न जाता वयाच्या 13 व्या वर्षी गाण्यासाठी स्टेजवर उभी राहते.ती आपल्या जादुई आवाजाने जगाला मोहिनी घालते तीहजारो गाणी गाते.ती मुलगी म्हणजे भारताची गाणं कोकिळा लता दिनानाथ मंगेशकर*
गेली सात दशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या,सुरेल आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या लतादीदींना दादासाहेब फाळके,भारतरत्न पदमश्री,पदमविभूषण,राजीव गांधी,महाराष्ट्र भूषण,नॅशनल फ्लिम अवार्ड,यांसारखे असंख्य मानाचे पुरस्कार मिळाले.अनेकदा फ्लिमफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या एकमेव गायक म्हणजे लतादीदी.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.
*दिदींचा मंगळागौर या पहिल्या चित्रपटापासून सुरू झालेला प्रवास हेमंत कुमार,महेंद्र कपूर,मोहम्मद रफी,मन्ना डे,आर डी बर्बन अशा महान संगीतकारांच्या गाणे गाण्यापर्यंत कधी आला हे समजलेच नाही. नागीण,प्रेमरोग,सत्यम शिवम सुंदरम,अमरप्रेम,पाकीजा, बरसात,अनारकली,मुगले आझम या चित्रपटातील दिदींची गाणी अजरामर झाली.ये मेरे वतन के लोगो हे गाणे पाणावलेल्या डोळ्यांनी लोकांनी ऐकले ती त्यांच्या आवाजाची ताकद होती.आशा,उषा,मीना,ह्रदयनाथ या भावंडाची जबादारी घेणाऱ्या दिदी कुणाला रडवत रहातात तर कुणाला ठामपणे उभे राहण्याची जिद्द देतात.मूळ हर्डीकर नाव बदलून गावाचा अभिमान म्हणून मंगेशकर झालेल्या दिदींना इतके सन्मान मिळाले पण त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले.आभाळाइतके कर्तृत्व गाजवणाऱ्या दिदी,सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करणाऱ्या दिदी,ज्यांच्या सुंदर आवाजावर संशोधन झाले त्या दिदींचे जीवन हेच सांगते की जी कला येते त्या कलेवर अफाट प्रेम करा.त्यासाठी वाटेल ते कष्ट उपसा.मगच त्यात तुम्हाला अढळ पद प्राप्त होते.असे पद की त्या जागेवरून तुम्हाला कुणी उठ म्हणून शकत नाही*.

Comments
Post a Comment