गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-7*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150249
*प्रासंगिक*
*वडील पी.वी.रमण व आई पी.विजया या उत्तम हॉलीबॉल खेळाडू असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी 5 जुलै 1995 मध्ये तिचा जन्म झाला. हैद्राबाद मधील पुसारला हे तिचे गाव.वयाच्या आठव्या वर्षांपासून ती बॅडमिंटन या खेळाकडे वळाली.तीचे लहानपणीचे प्रशिक्षक होते मेहबूब अली त्यांना तिच्या क्षमतेचा अंदाज आला होता .मग त्या मुलीला आपल्या पेक्षा कुणीतरी आणखी चांगले बॅडमिंटन शिकवणारे हवे म्हणून तिचा प्रवेश गोपीचंद अकॅडमी मध्ये झाला.तेथे तिचे प्रशिक्षक होते पुल्लेला गोपीचंद .तेथे तिचा खेळ असा काही बहरला की एकामागून एक जागतिक स्पर्धा ती जिंकत गेली .आणि एक दिवस त्या मुलीने सलग दोन ऑलम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला होण्याचा मान मिळवला .हे अविश्वसनिय स्वप्न सत्यात आणणारी ती मुलगी म्हणजे पुसारला वेंकटा सिंधू अर्थात पी.व्ही.सिंधू.*
सिंधूला बॅडमिंटन कोर्ट वरील साम्राज्ञी ही उपाधी सार्थ ठरते.डच ओपन स्पर्धा, इंडियन ओपन ग्रांपी,मलेशिया ओपन ग्रांमी,BWF जागतिक स्पर्धा, कोरिया ओपन सुपर सिरीज,जागतिक बॅडमिंटन स्पर्धा,2016ची रियो ऑलम्पिक मध्ये रौप्यपदक या साऱ्या स्पर्धेत तीने पदकांची लयलूट करून भारतातील जनतेला अनेक आनंदाचे क्षण दिले . असाच एक क्षण सिंधूने 1 ऑगस्ट 2021 ला तमाम भारतीयांना दिला . आपल्या नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन करत टोकियो ऑलम्पिक मध्ये चिनी खेळाडू बिंग जियाओला नमवत ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले.
*अशा या महान खेळाडूला अर्जुन पुरस्कार,पदमश्री पुरस्कार,राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार,पदमभूषण पुरस्कारांनी, गौरवण्यात आले आहे*.
*जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पाच पदके मिळवणारी जगातील एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे सिंधू. बॅडमिंटन कोर्ट म्हटले की आठवते ती प्रचंड आत्मविश्वासाने देशासाठी खेळताना उभी असणारी सिंधू. सातत्यपूर्ण कामगिरीने यशशिखरावर पोहोचलेली ती सिंधू.आयुष्याला अफाट मेहनतीने त यशाचे पैलू पडणारी सिंधू .तिचे कौतुक करायलाही शब्द अपुरे पडतात.अशा हरहुन्नरी तमाम भारतीयांचा अभिमान असणाऱ्या सिंधूला पुढील* *कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा*.

Comments
Post a Comment