गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३६
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-36*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*व्यापाराची पंढरी म्हणजे गुजरात राज्य.याच गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील महुवा येथे त्याचा जन्म 1925 मध्ये झाला.त्याचे सुरुवातीचे शिक्षण गुजरात येथेच झाले.त्याला स्वतःचा व्यवसाय असावा असे नेहमी वाटत असे.पण घरातील लोकांच्या आग्रहाखातर तो मुंबई येथे वकिली शिकण्यासाठी आला.तो वकिलही झाला.पण तेथे त्याचे मन रमत नव्हते.पुढे तो मुलगा एक कंपनी स्थापन करतो ती कंपनी भारतातीलच नाही तर जगातील नावाजलेली कंपनी बनते.ती कंपनी म्हणजे फेविकॉल बनवणारी Pidilite कंपनी.आणि हे व्यवसाय साम्राज्य उभा करणारा तो मुलगा म्हणजे फेविकॉल मॅन बलवंत पारेख*
वकिली करायची नाही म्हणून ते काही दिवस प्रिंटींग प्रेस मध्ये काम करतात.पुढे काही दिवस लाकडाच्या वखारीत काम करतात.तेथे त्यांच्या असे लक्षात येते की जनावरांच्या चरबी पासून बनवलेला व प्रचंड उष्णता द्यावा लागणारा डिंक लाकडे जोडताना कारागीरांना खुप अडचणींचा ठरत आहे.हे काम खुप वेळखाऊ होते.मग त्यांनी सोपा आणि सहज वापरता येईल असा डिंक बनवण्याचा निश्चय केला.खुप प्रयत्नानंतर त्यांना एक सफेद व सुगंधी डिंक बनवण्यात यश आले.तोच डिंक त्यांनी pidilite कंपनीच्या माध्यमातून बाजारात आणला आणि त्याला नाव दिले Fevicol.आज प्रचंड असा लोकप्रिय ब्रँड फेविकॉल आहे.यामागे कष्ट आहेच पण जाहिरातीचाही मोठा वाटा आहे. "ये फेविकॉल का मजबूत जोड है तुटेका नही" चुटकी मे चुपकाये फेवी क्विक,यांसारख्या त्यांच्या जाहिराती प्रचंड लोकप्रिय झाल्या.
*पुढे pidilite कंपनीने काळानुसार बदल करत फेविक्विक,एमसील,डॉक्टर फिक्सिइट,बाजारात आणून आपले वर्चस्व आजही कायम ठेवले आहे.दोन वस्तुंना जोडणारी ही उत्पादने ,अनेक माणसे ग्राहकांच्या रूपाने जोडत गेली.आज pidilite कंपनीत हजारो कामगार काम करतात.कंपनीची करोडो रुपये उलाढाल आहे.पण बलवंत पारेख यांची दूरदृष्टी यात आहे.तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करा.बाजारात लोकांना काय पाहिजे ते तुम्ही द्या त्यांची नेमकी अडचण ओळखून त्या वस्तू निर्माण करा. मग मिळणारे यश अदभुत असेल हाच मूलमंत्र बलवंत पारेख यांच्या आयुष्यातील संघर्षातून मिळतो*

Comments
Post a Comment