गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-२२
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-22*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*जिल्हा सातारा असला तरी त्याचा जन्म पुण्यात 24 मार्च 1951ला झाला.लग्नानंतर जिने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टर झाली अशी मेहनती आई नलिनी त्याला मिळाली. जणू काही जिद्द त्याला जन्मत:च मिळाली असावी. डॉक्टर आई ,व्यावसायिक असणारे वडील श्री.नारायण यांनी घरात चांगले वातावरण असतानाही त्याला हट्टाने मराठी माध्यमातून शिकवले.लहानपणापासून खेळ,विविध कला,यात तो पारंगत होता.11 वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे झाल्यावर सोलापूर येथील वैशंपायन महाविद्यालयातून तो एम.बी.बी.एस तर जे जे या नावाजलेल्या महाविद्यालयातून तो भूलतज्ञ झाला.पुढे वयाच्या 35 व्या वर्षी अचानक एका डबघाईला आलेल्या सामाजिक संस्थेची सचिव म्हणून जबाबदारी त्याच्यावर येते.ते आव्हान पेलण्याची तयारी तो आपल्या सहकार्यांना दाखवतो.पुढे दोन वर्षात तो मुलगा त्या संस्थेसाठी असे काही कष्ट घेतो की एक कोटींचा कर्जाचा बोजा असणारी संस्था आर्थिक स्थितीत मजबूत तर होतेच शिवाय1550हून अधिक कर्मचाऱ्यांना वेतन देते. ती समाजउपयोगी काम करणारी संस्था म्हणजे द बॉम्बे मदर अँड चिलड्रन वेल्फेअर सोसायटी म्हणजे मुंबई माता बाल संगोपन संस्था मुंबई.आणि हे अशक्य काम करणारा तो मुलगा म्हणजे डॉक्टर माधव नारायण साठे*.
डॉक्टर साठे सरांनी समाजासाठी जे काम केले त्याचीच पावती म्हणून त्यांना सिम्बॉयसेस पुरस्कार,हुतात्मा राजगुरू जीवन गौरव पुरस्कार, मिळाले आहेत.सत्यजित मुजुमदार यांनी डॉक्टरांनी केलेल्या या कार्यावर शोधनिबंध लिहला आहे.ऑस्ट्रेलियन लेखिका कॅथ्रीन मोली तिच्या पुस्तकात डॉक्टरांबद्दल खूप काही लिहताना त्यांचा उल्लेख 'conscious,emotiinally, intelligent leader 'असा करते.यावरून त्यांच्या कार्याची प्रचिती येते*.
*संस्था टिळक हॉस्पिटल- मुंबई-,भिलवडी हॉस्पिटल -सांगली,मस्कर हॉस्पिटल कॅन्सर पेशंट कॉनवेल्ससेन्ट होम,मुंबई माता बाल संगोपन* *हॉस्पिटल-राजगुरूनगर चालवून कमी खर्चात लोकांना उत्तम आरोग्याची हमी देते.राजगुरूनगर मधील दवाखान्यात वर्षाला सरासरी 700 बाळे जन्माला येतात. हे काम संस्था माफक दरात 1942 पासून निष्ठेने करत आहे.ग्रामीण भागातील सरकारी शाळेत सर्व आधुनिक सुविधा पोहचल्या पाहिजे यासाठी डॉक्टरांनी ध्यास घेतला. दिवस रात्र याबद्दल विचार* *करताना,त्यासाठी दाते शोधतात आणि मग उभी राहते* *एक वेगळी शैक्षणिक चळवळ. 401शाळांना ई लर्निंग,336* *शाळांना सोलर,6500 पेक्षा अधिक वृक्ष लागवड,2500 पेक्षा* *अधिक mscit शिक्षित मुले मुली,2300 पेक्षा अधिक मुलांना* *मोबाईल व्हॅन द्वारे संगणक शिक्षण,3500 पेक्षा अधिक* *महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिवण क्लास प्रशिक्षण, शाळांना* *टॅब वाटप,सायकल वाटप,आरोग्य शिबिरे,घेत संस्था ग्रामीण भागात* *पोहचली.मुंबईत 600 पेक्षा अधिक गरीब मुलांसाठी* *पाळणाघर चालवणारी संस्था, कॅन्सर रुग्ण मुंबईला आल्यावर त्यांचे राहण्याचे हाल होतात* *म्हणून त्यांची माफक दरात जेवणापासून सर्व सोय करणारीकरणारी ही संस्था.आज अनेकांसाठी आशेचा किरण आहे*.
.* *ती परत* *उभी* *राहिली* *ती साठे* *सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या* *मदतीने. डॉक्टर असणारा हा* *माणूस लाखो रुपये पायाशी लोळण घेत असताना* *समाजासाठी काहीतरी केले* *पाहिजे या एकाच ध्येयाने आपले काम सांभाळून वयाच्या 35 व्या वर्षांपासून त्याच तारुण्यात* *आजही काम करत आहे.साधी राहणी पण विचारांची विदवत्ता* *लाभलेले डॉक्टर आपल्याला पदोपदी हेच सांगत* *राहतात.अशक्य मीही म्हटले* *असते तर विकायला काढलेली संस्था वैभवाने परत उभी राहिली* *नसती.कोणतेही काम पूर्ण प्रयत्नाने करा.जास्तीत जास्त* *कामात अपयश येईल यापेक्षा वाईट काहीच होणार नाही.पण* *प्रयत्नानंतर येणारे यश चिरकाल टिकणारे असेल*.

Comments
Post a Comment