गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- २८
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग-28*
*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
*हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे त्याचा जन्म1899 मध्ये एका ज्यू परिवारात झाला.लहानपणी तो तसा चिकित्सक होता.तो काही न काही छोटे मोठे प्रयोग करत असे. शाळेत असताना त्याला अभ्यासबरोबर चित्रकलेची प्रचंड आवड होती.पुढे तो शिकून त्याच्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करू लागला.तेथे त्याला लिहताना शाईच्या पेनची अडचण भासू लागली.शाईचे डाग कागदावर पडून लिखाण खराब दिसत असे.मग याने निश्चय केला की आपण डाग न पडणारा पेन शोधून काढू.पुढे या मुलाने बॉल पेनचा शोध लावून साऱ्या जगाचे लिहणे सुसहय केले.या बॉल पेनचा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे लँडीस्लावो जोस बिरो*
पत्रकार म्हणून काम करताना बिरो एकदा पेपर छपाई च्या कारखान्यात गेले .तेथे त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.की कागदावर लिहल्यावर शाई लगेचच सुकेल असा पेन पेपरला जी शाई वापरतात त्या शाई पासून बनवता येईल. त्यांनीसुरुवातीला एक नीब बनवून त्यावर शाईची एक पातळ लेअर लावली. त्या नीबवर एक छोटा बॉल बसवला.जेव्हा त्या नीबने कागदावर लिहले जायचे तेव्हा त्या नीबमधील बॉल फिरायचा.मग कारटेज मधून शाई बाहेर घ्यायचा.याच प्रयत्नातून ते बॉल पेन बनवायला यशस्वी झाले.1938 साली त्यांनी बिरो पेन नावाने याचे पेटंट मिळवले.आपल्याकडे या पेनला।बॉल पेन म्हणत असले तरी ब्रिटन,ऑस्ट्रेलिया, आयर्लंड येथे या पेनला आजही बिरो पेनच म्हणतात.
*असे असले तरी बॉल पेन सार्वजनिक ठिकाणी विकायला1945 साल उजाडले.पहिल्या वेळी पोलीस बंदोबस्त लावून हे बॉल पेन विकावे लागले होते.त्याचा उपयोग पाहून ब्रिटीश रॉयल फोर्स कंपनीने बिरो यांच्या कंपनीला 30 हजार पेन बनवण्याची ऑर्डर दिली.जलद सुकणारी शाई हेच या पेनचे मुख्य वैशिष्ट्य होते. आज जगात एका सेकंदाला सरासरी दीडशे पेन विकेल जातात.जगात सगळीकडे वापरल्या जाणाऱ्या PEN चे फुल फॉर्म अनेक आहेत ,पण प्रचलित फुल फॉर्म Poets Essayists Noveliste असाच वापरला जातो.शाई सोडणाऱ्या किचकट फाउंटन पेन पासून आपल्याला मुक्त करून बॉल पेनचा नजराणा देणारे बिरो अनेक वेळा अपयशी झाले.पण त्यावर मात करत त्यांनी बॉल पेनचा शोध लावला.बिरो यांचे आयुष्य आपल्याला जो संदेश देते तो असा सहनशक्ती,चिकाटी,कष्ट यापासून मिळणारे यश कधीही हार मानणारे नसते.*

Comments
Post a Comment