गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१७

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-17

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*अविवाहित महाविद्यालयीन तरुणीच्या पोटी त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1955 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झाला.ती अविवाहित होती म्हणून त्याला एका वकिल दांपत्याना त्याला पूर्ण शिक्षण देणे या अटीवर  दत्तक देण्यात आले.त्यांचीही परिस्थितीत बेताचीच होती.अशा वेळी  त्याचे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सुटले.पण कॅलिओग्राफी चा छंद त्याने सोडला नाही. जेवणासाठी रिकाम्या कोकच्या बाटल्या त्याने विकल्या, रविवारी मंदिरात पोटभर जेवण मिळते म्हणून 7 मैल तो  पायी चालत जायचा.इतके सगळे कष्ट  सहन करूनही त्याने मित्राबरोबर एका छोट्या गॅरेजमध्ये एक संगणक कंपनी सुरू केली.पुढे ती कंपनी दहा वर्षात 2 बिलियन डॉलर्स आणि 4000 कामगारांची कंपनी बनली.ती कंपनी म्हणजे प्रचंड लोकप्रिय अशी ॲपल कंपनी.आणि हे स्वप्नवत काम करून दाखवणारा तो मुलगा म्हणजे स्टीव्ह जॉब्स*.                         


ॲपल ने आपले ॲपल- 1,ॲपल-2 या सिरीजचे संगणक बाजारात आणले आणि ते रातोरात संपले. ॲपल 3 सीरिज मध्ये कंपनीला प्रचंड तोटा झाला.स्टीव्ह ला याला जबाबदार धरून कंपनीचा राजीनामा द्यायला भाग पाडले.पण तो खचला नाही.ॲपल मधून बाहेर पडल्यावर त्याने नेक्स्ट,आणि पिक्सर कंपनी स्थापन केली.पुढे नेक्स्ट परत ॲपल ने विकत घेऊन स्टीव्ह ला परत सन्मानाने ॲपल चे ceo केले.                     आय पॅड ,आय फोन,म्युझिक प्लेअर,आय ट्यून,म्युझिक सॉफ्टवेअर हे  सारेस्टीव्ह च्या कल्पक बुद्धीतुन  तयार झालेले तंत्रज्ञानाचे आविष्कार होते.     

                                      

*स्टीव्ह  स्वादुपिंडाच्या कॅन्सर  मधून सुखरूप बाहेर पडला पण त्याने कामावरील निष्ठा कधी कमी पडू दिली नाही.ॲपल मधून बाहेर पडल्यावर तो काही दिवस भारतात राहिला तेही मानसिक शांती साठी हेच ते भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्ये.स्टीव्ह  जाताना जगासाठी खुप सारे तंत्रज्ञान मागे  सोडून गेला.आणि आपल्याला हेही सांगून गेला ,आयुष्य कधी कधी तुमच्या डोक्यावर जोराचा प्रहार करील तरीही स्वतःवरील विश्वास ढळू देऊ नका.शिकण्याची भूक बाळगा कारण उत्कटता असणारे लोकच जगाला काहीतरी वेगळे देऊ शकतात*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०