गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - १

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग-1*

*📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*

    8308677799

    8806150248



*भारतीय सैन्य दलात नोकरी करणाऱ्या पित्याच्या पोटी हरियाणा येथे तिचा जन्म झाला.वडिलांचे  देशप्रेम ती लहान  असल्यापासून पहात आली होती.देशभक्तीचे बाळकडू जणू तिला जन्मजात मिळाले होते.आपल्या वडीलांसारखे देशासाठी  काहीतरी करावे अशी  ही तिची समज आल्यापासून   इच्छा होती.भरतसिंह मेमोरील स्कूल ही तिची शाळा.येथेच तिच्या स्वप्नांना पंख फुटले,आणि ठरले आपण पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या रांगड्या कुस्तीच्या खेळात भविष्य घडवायचे .मार्ग खडतर होता ,पण सदैव भक्कम साथ देणारे वडील जयभगवान निडानी लेकीच्या स्वप्नांसाठी ठामपणे उभे राहिले.या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिला अंशु मलिक सारखे कसेलेले प्रशिक्षक मिळाले,आणि  सुरू झाला न थांबण्याचा प्रवास प्रचंड मेहनत आणि जिद्दीचा प्रवास.मग तिने अनेक कुस्ती स्पर्धेत भाग घेत मागे वळूनच पाहिले नाही.*


खेलो इंडिया मिशन स्पर्धेत सुवर्णपदक,2020राष्ट्रीय  स्कूल खेळ चॅम्पियन स्पर्धेत अनेक पदकांची लयलूट,2020मधील बिहार येथील  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक, याशिवाय अनेक राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकांची लयलूट करत ती स्वतःला सिद्ध करत होती.


*इतके सारे यश होते पण तिला  काही तरी  कमी  वाटत होते .आपण देशाची मान उंचावेल असे काहीतरी केले पाहिजे असे तिचे मन सांगत होते आणि ती संधी आली. तारीख होती 24 जुलै 2021 ठिकाण होते हंगेरीचे बुडपेस्ट येथे विश्व चँम्पियन कुस्ती सर्धेत 73 किलो वजनी गटात बेलारूसच्या महिला पैलवानाला चितपट करून सुवर्ण पदक जिंकत तिने ऐतिहासिक कामगिरी केली.ही कामगिरी करणारी जिद्दी खेळाडू म्हणजे कुस्तीपटू

 *प्रिया मलिक* .भारताचा तिरंगा येथे डौलाने फडकताना साऱ्या भारतीयांचा उर जसा अभिमानाने भरून आला, तसाच ज्या बापाने लेकीच्या स्वप्नांचे इमले भक्कम पणे उभे केले त्या सैनिक असणाऱ्या बापाचा आनंद काही वेगळाच.*


*एक अशी खेळाडू जिचे काही दिवस नावही माहीत नव्हते पण  प्रियाने असे काही अदभुत करून दाखवले की जगाला तिची दखल घ्यावी लागली यशाला कुठलाही शॉर्टकट्स नसतो .यशाचा राजमार्ग  प्रचंड मेहनत ,जिद्द ,कष्ट यातूनच जातो हेच प्रियाने  दाखवून दिले.म्हणून ती यशस्वी ठरली.अनेक कठीण प्रसंगात संयम ठेवत कार्य करीत राहिले की यश पायाशी येतेच येते हेच यातून शिकायचे. जबरदस्त आत्मविश्वासाचे अनेक चांगले परिणाम होतात.पुढिल अनेक पदके जिंकण्यासाठी प्रिया मलिकला  खुप खुप शुभेच्छा* 


*📝आजपासून ही नवी लेखमाला चालू करत आहे आपल्या प्रतिक्रिया कळवा इतर ग्रुप वर शेअर करा🙏🙏*

Comments