गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 135

 

*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -35-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म जर्मनीमधील मिसेन सॅक्सनी येथे छोट्या गावात साधारण परिस्थिती असणाऱ्या घरात 10 एप्रिल 1755 रोजी झाला. त्याचे वडील ख्रिश्चन गॉटफ्रीड ऍनिमल हे एक चित्रकार आणि पोर्सलेन पॉटरीवर डिझाईन करणारे कामगार होते.लहान वयात स्वतःच्या तल्लक आणि तीव्र बुद्धिमत्तेमुळे तो शाळेत शिक्षकांचा लाडका होता.याच बुद्धिमत्तेच्या जोरावर तो मुलगा ग्रीक,लॅटिन,इंग्रजी,फ्रेंच,इटालियन आणि अरेबिक भाषांवर प्रभुत्व मिळवतो.जोहान्न मुल्लर नावाचे शिक्षक त्याच्या जीवनात देवदूत बनून येतात.त्याची हुशारी ओळखून त्याला शिक्षणात प्रचंड मदत करतात. किशोर वयात स्वतःच्या  शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तो मुलगा पुस्तकांचे अनुवाद करण्याचे काम करतो. पुढे तो मुलगा इतक्या कठीण परिस्थितीतही लीपझिंग आणि व्हिएन्ना या विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे शिक्षण पूर्ण करतो. 1779 मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी मिळवतो.पुढे तो मुलगा पारंपारिक औषधोपचारांच्या साईड इफेक्ट्स व मर्यादांमुळे नवीन औषध पद्धती विकसित करण्याचा विचार करतो.Like cures Like  समान समान उपचार. या तत्त्वावर आधारित एका उपचार पद्धतीचा शोध लावतो.याचा अर्थ असा की एखाद्या आजाराचे उपचार त्या आजारासारख्या लक्षणे निर्माण करणाऱ्या औषधांच्या अल्प मात्रेतून करता येतात. हा होमिओपॅथीचा आगळावेगळा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन*.


*1980 मध्ये एकदा कोलेन्स मटेरिया मेडिका या पुस्तकाच्या अनुवादाचे काम त्यांच्याकडे आले.त्यात विविध वनस्पतींच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती होती.डॉक्टर हॅनिमन यांना त्या माहितीचे कुतूहल निर्माण झाले. पेरिवियन डार्क या झाडाची साल मलेरियावर गुणकारी असते या माहितीसह या सालीपासून औषध तयार करण्याची माहिती त्यात होती. त्या माहितीनुसार त्यांनी औषध तयार करून स्वतः ते औषध त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला व ते आजारी पडले.त्यांच्या आजाराची लक्षणे आणि मलेरियाची लक्षणे यात बरेच साम्य होते.त्यांनी ते औषध घेणे बंद केल्यावर हळूहळू ती लक्षणे सुद्धा कमी होत गेली.त्यानंतर डॉक्टर हॅनिमन यांनी अशाच पद्धतीने बरीच औषधे स्वतःवर आणि इतरांवर प्रयोग करून होणारा परिणाम अभ्यासला,आणि निष्कर्ष काढला की निरोगी माणसात आजाराप्रमाणे लक्षणे निर्माण करणारी औषधे रुग्णाला दिल्यास ती औषधे आजार बरा करू शकतात.यावर अनेक संशोधनानंतर डॉक्टर  हॅनिमन यांनी होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आणि त्यांचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले. त्यांनी लहान मात्रेत औषध वापरल्यास शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवता येते असे सिद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या organon of the Rational Art of Healing या  पुस्तकात होमिओपॅथीच्या तत्त्वांचा सविस्तर उल्लेख आहे.हे पुस्तक होमिओपॅथीचे मूलभूत ग्रंथ मानले जाते*.


*डॉ.हॅनिमन यांनी होमिओपॅथी पद्धतीचा शोध लावला त्यांच्या या कार्याचा  गौरव म्हणून डॉ.हॅनिमन यांना पॅरिस आणि जर्मनीमध्ये वैद्यकीय क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.त्यांच्या नावाने येथे अनेक शैक्षणिक संस्था आणि ग्रंथालय आहेत. त्यांचा दहा एप्रिल हा जन्मदिन जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी वैद्यकीय इतिहासात केलेले कार्य अजरामर आहे.त्यांच्या संशोधनामुळे लाखो लोकांचे  जीवन आरोग्यमयरित्या सुधारले.होमिओपॅथी एक महत्त्वाची उपचार पद्धती म्हणून  प्रचलित झाली. आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पुस्तकांचे अनुवाद करणारे डॉक्टर यांचे आयुष्य कष्टाळू होते,मात्र स्वाभिमानी होते.त्यांचे आयुष्य आपल्याला आयुष्यात हाच आदर्श देते की,प्रामाणिकपणा कष्ट करण्याची सवय आणि चिकित्सक वृत्ती यातून तुम्ही कुठल्याही क्षेत्रात अद्भुत आणि असामान्य असे यश मिळवू शकता.ज्या यशामुळे तुमचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर होते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०