गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 136


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -36-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*फ्रान्स देशातील ब्लॉइस येथे त्याचा जन्म 22 ऑगस्ट 1647 मध्ये झाला. त्याचे वडील डेनिस हे डॉक्टर होते. वडिलांच्या वैद्यकीय व्यवसायामुळे त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दलची प्रेरणा मिळते. यामुळेच त्याला शास्त्रीय विचारसरणी आणि प्रयोगशीलता यांची आवड लहान वयातच निर्माण होते आणि येथेच त्याच्या संशोधनाचा पाया घातला जातो. पुढे तो मुलगा गणित,भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा सखोल अभ्यास करतो.त्याला संशोधनाची आवड लागते.पुढे तो मुलगा संशोधन करत असताना त्याच्या असे लक्षात येते की स्टीमच्या म्हणजेच वाफेच्या दाबामुळे उष्णतेचा प्रभाव वाढतो आणि पदार्थ अधिक लवकर शिजतो.यावरूनच त्याने तापमान आणि दबाव यामध्ये थेट संबंध असतो हा शोध लावला.हे सिद्ध करण्यासाठी त्याने एक बंद भांडे तयार केले ज्यामध्ये पाणी तापवले असता वाफ निर्माण होऊन मोठा दाब तयार होतो.हा दाब पदार्थ जलद शिजण्यासाठी उपयुक्त ठरतो.पदार्थ सहज शिजवण्यासाठीचा हा शोध अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक ठरला.याच शोधातून जगातील प्रत्येक स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या कुकरचा शोध लागला.हा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ डेनिस पॅपिन*.


*पॅपिन यांनी डायजेस्टर नावाची उपकरणे तयार केली जी उपकरणे प्रेशर कुकरची प्राथमिक आवृत्ती होती.हे उपकरण बंद झालेल्या भांड्याप्रमाणे होते ज्यामुळे पदार्थ लवकर शिजत असत.प्रेशर कुकर मधून तयार होणारा अतिरिक्त दाब सोडण्यासाठी त्यांनी सुरक्षितता झडप तयार केली.यालाच हल्लीच्या भाषेत आपण कुकरची शिट्टी म्हणतो.त्यांनी हा भाग प्रेशर कुकरचा महत्त्वाचा घटक आहे दाब नियंत्रित करण्यासाठी तो वापरला जातो हे सिध्द केले.त्यांनी तयार केलेले डायजेस्टर लोखंडी किंवा तांब्याच्या धातूचे भांडे होते. ज्यामध्ये झाकण घट्ट बसवलेले असे.हे उपकरण अन्नपदार्थ लवकर शिजवण्यासाठी वापरले जाई.पॅपिन यांचा शोध औद्योगिक प्रक्रियांमध्ये उष्णता आणि वाफेचा उपयोग करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.याच तत्वावर आधारित पुढे स्टीम इंजिन,भट्टी व इतर अनेक उपकरणांचे तंत्रज्ञान विकसित झाले. त्या काळात विज्ञान क्षेत्रातील कुकरचा शोध क्रांतिकारी ठरला आणि त्याचे उपयोग आपण आजही अनुभवत आहोत*.


*पॅपिन यांच्या शोधांवर आधारित अनेक प्रगती पुढील शतकात झाली.जसे की स्टीम इंजिनची सुधारणा त्यामुळे त्यांचे नाव इतिहासात आदराने घेतले जाते. त्यांच्या संशोधनाचे महत्त्व त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते त्यांच्या कार्याचा खरा सन्मान विज्ञान क्षेत्रात त्यांच्या मृत्यूनंतर झाला. कुकरचा शोध लावून करोडो गृहिणींचे स्वयंपाक घरातील काम सोपे करणारे पॅपिन यांचे शेवटचे आयुष्य खडतर गेले.डेनिस पॅपिन यांचे आयुष्य आपल्याला हिच प्रेरणा देते कि आपल्याकडे असणारे ज्ञान व कौशल्य हे आपल्या पुरते मर्यादित न ठेवता ते समाजासाठी कसे उपयोगी पडेल यासाठी झटत राहावे. लोकांनी आपले काम लगेच ओळखले नाही तरी एक दिवस असा येतो की आपल्या जगावेगळ्या कामातून आपली दखल साऱ्या विश्वाला घ्यावी लागते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०