गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग -६
[9:40 PM, 7/31/2021] chand: गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
📝भाग-6*
📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*
8308677799
8806150248
पुणे जिल्ह्यातील खडकी येथे एका तमिळ सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला.घरात त्याच्यासह पाच भाऊ होते.मैदानाची देखभाल करणारे वडील नागलिंगम व गृहिणी असणारी आई अंदालम्मा संसाराचा गाडा रेटत होते . हा लहान असल्यापासून भाऊ आणि वडिलांबरोबर मैदानावर जायचा. तुटलेल्या लाकडी स्टिक आणि वापरलेले चेंडू घेऊन तासनतास खेळायचा .त्याला हॉकी खेळाचा असा काही नाद लागला कि त्याने त्या खेळालाच आयुष्य बनवले. त्यात तो इतका पारंगत झाला की पुढे तो भारतीय हॉकी संघाचा आघाडीचा खेळाडू तर बनलाच शिवाय सुवर्णयुग असणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार ही झाला. तो महान खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले.
धनराज हे एकमेव असे भारतीय खेळाडू आहे की त्यांनी चार ऑलम्पिक,चार जागतिक हॉकी करंडक,चार चॅम्पियन चषक,चार आशियाई चषक, स्पर्धेत भाग घेतला आहे.ते कर्णधार असताना भारतीय हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक,आणि आशिया कप जिंकून भारतीयांना अभिमानाचे क्षण दिले.300पेक्षा अधिक सामने खेळताना 170 पर्यंत गोल त्यांनी देशासाठी केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अर्जुन पुरस्कार,के.के.बिर्ला पुरस्कार,राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.सिडनी येथील जागतिक संघात अंतिम अकरा खेळाडू मध्ये समावेश असणारे एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले .
हॉकी म्हटले की आठवतात ते आशियाई स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यावर प्रेक्षकांचा तिरंगा घेऊन पाकिस्तानी खेळाडू चेंबर पुढे जाऊन तिरंगा फडकवणारे निडर,बेडर,प्रचंड देशप्रेमी,धनराज पिल्ले.वाईट परिस्थिती जणू काही त्यांना झुकवायलाच आलेली होती. पण त्यावर मात करून ते ध्येयवेडे झाले .त्यांनी परिस्थितीला झुकवत यशाचा एक नवा रस्ताच जणू इतरांना दाखवून दिला.म्हणूनच त्यांना हॉकी चे कपिल देव म्हटले जाते.
Comments
Post a Comment