गोष्ट माझ्या आईची भाग ४९

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*सुनीता देशपांडे*            

  📔       *भाग - 49*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते सरला,तर वडील सदानंद ठाकूर.एखादे व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळे असते.त्यात काहीतरी वेगळे असते.अशी माझी आई मला नेहमी इतरांपेक्षा वेगळी वाटायची, आणि तितकीच आवडायचीही*.


*माझा जन्म जसा रत्नागिरीत झाला तसे प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले.पुढील शिक्षण मुंबई बालमोहन विद्यामंदिर येथे झाले.मग मला परत रत्नागिरीला येण्याची संधी मिळाली.येथे पटवर्धन प्रशालेत माझे मॅट्रिक चे शिक्षण झाले.उच्च शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज येथे पूर्ण केले.हे  सगळे शिक्षण  आई बाबा मागे ठामपणे उभे राहिले म्हणून झाले*.


*मी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला,वर्तमान पत्र काढले हे सगळे ऐन तारुण्यात सुरू होते.पण घरातून याला कुठेही विरोध झाला नाही.आईचे वेगळेपण लहानणापासूनच माझ्यात आले होते.म्हणून की काय पु.ल.देशपांडे नावाच्या वादळाशी मी विवाह केला.साहित्यिक म्हणून 'आहे मनोहर तरी' हे माझे पुस्तक खूप गाजले*. 


*यात सुरुवातीपासून जे उत्तम शिक्षण मिळाले याचा वाटा मोठा होता.मी शिक्षिका म्हणून नोकरी करताना आईने केलेले उत्तम संस्कार या ठिकाणी कामी आले.त्या काळात मी बी.एड,एम.एड केले इतकी शिकले यामागे घरून भक्कम साथ होती म्हणूनच*.


*आभाळाला जर कुणी विचारले तुझी आई कुठे आहे?त्याला ते सांगता येत नाही त्याचे ठीक त्याला कुणी वाली नसतो.पण आई नसलेल्या मुलाला कुणी विचारले तुझी आई कुठे आहे?त्याने कुणाकडे दाद मागावी*?

Comments