गोष्ट माझ्या आईची भाग ४५

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*विराट कोहली महान क्रिकेटपटू*            

  📔       *भाग - 45*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते सरोज कोहली.माझा जन्म दिल्ली मधील उत्तम नगर परिसरात झाला.मला नेमके आठवत नाही पण घरातील सगळे सांगतात की तीन वर्षाचा असताना मी हातात बॅट घेतली.मी वडिलांना मला चेंडू टाकायला लावत असे.माझे क्रिकेट वेड पाहून माझा दिल्ली क्रिकेट अकादमी मध्ये प्रवेश झाला.वडील मला अकादमी मध्ये ने-आण करत असे.त्यांचे आम्हाला अकाली सोडून जाणे आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता*.


*मग आई उभी राहिली ठामपणे माझ्या मागे आणि माझ्या खेळाच्या मागेही.तिने कितीही अडचणी आल्या तरी माझा खेळ बंद नाही केला.आमचा व्यवसाय नीट चालत नव्हता.पैशाची कमतरता भासत असे.आई हे मला कधीच जाणवू देत नसे.तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर घरातील अडचणी कधीच संपत नाही,असेच जणू ती मला सांगत होती*.


*मी खेळा बरोबर अभ्यासातही खूप हुशार होतो माझे शिक्षक मला अभ्यासातील तेजस्वी तारा म्हणत असे.भाऊ विकास आणि बहिण भावना यांचे सगळे करताना आईने माझ्याकडे कधी दुर्लक्ष केले नाही.माझी भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यावर आईचा आनंद काही वेगळाच होता.आज मी क्रिकेट मध्ये इतके यश मिळवले यात आईने खेळाला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच.वडिलांनंतर खेळ बंद झाला असता तर पुढे काय ही कल्पनाही सहन होत नाही*.


*मुलांच्या वडिलांनी अर्धवट जग सोडले की बायकोच्या आयुष्यात पूर येतो.आई म्हणून तिला पूर ओसरायची वाट पहायला मुभा नसते.तिला त्या पूरात मुलांसाठी पोहायचे असते आयुष्यभर*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०