गोष्ट माझ्या आईची भाग ४८

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*निकोला टेस्ला महान शास्त्रज्ञ*          

  📔       *भाग - 48*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझा जन्म क्रोएशिया मध्ये झाला.वडील मिलुतीन टेस्ला,तर आईचे नाव होते डुका टेस्ला.घरातील पाच मुले यात माझा नंबर चौथा होता.मी शाळेत अत्यंत हुशार होतो.काही गणिते मी सहज मनातल्या मनात करीत असे त्याचे शिक्षकांना फार कौतुक वाटतं असे*.


*आईने माझी हीच जमेची बाजू समजून मला झेक,इंग्रजी,लॅटिन,फ्रेंच,जर्मन या भाषांचे शिक्षण दिले.तुझी कुठेही अडचण होवू नये म्हणून तुला अनेक भाषा यायला पाहिजे इतकी साधी तिची विचार सरणी होती.मी अभ्यासात हुशार असल्याने तिला त्याकडे लक्ष कधी विशेष असे लक्ष द्यावे लागले नाही*.


 *ती आम्हा भावंडांची खूप काळजी घेत असे.माझे सुरवातीपासून साहित्य जोडणे,उघडणे याचे वेड पाहून कदाचित तिला अंदाज आला असावा मी वेगळे काहीतरी करणार आहे.यामुळेच ती हे सगळे करताना मला कधी रागवली नाही*.


*आईच्या याच पाठबळामुळे घरघरात वीज वाहून नेणारी AC करंट चा शोध मी लावू शकलो.मी रडारचा शोध,लावताना 300पेक्षा अधिक शोध लावले हे आईने योग्य वेळी दिलेल्या पाठबळामुळे .मी घराघरात वीज वाहून नेणाऱ्या AC करंट चा शोध लावला तेव्हा 'हाच तो आहे ज्याने पृथ्वीला प्रकाशने सजवले ' हा माझा जो सन्मान झाला याचे कारण आईने माझ्या प्रयोगांना लहानपणी दिलेले पाठबळ हे होते*.


*आईची काही हरवलेली स्वप्ने असतात ती मुलांकडे पाठवून देते.त्यातील जी पूर्ण होतात त्याचा ती आनंद व्यक्त करते.जी अपूर्ण राहतात त्यावर ती मुलाकडे कधीच बोलत नाही अगदी शेवटर्यंत*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०