गोष्ट माझ्या आईची भाग ४७

 *📝गोष्ट माझ्या आईची*

*📝  .*थॉमस अल्वा एडिसन*            

  📔       *भाग - 47*            

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248           

    

*माझ्या आईचे नाव होते नॅनसी एडिसन. मिलान ओहिओ यु ए येथे माझा जन्म झाला.घरात आम्ही सात भावंडे.घरात मी सर्वात लहान होतो.लहानपणी सगळे व्यवस्थित सुरू होते मी जसा मोठा होत गेलो तसे आईच्या लक्षात आले मला बोलायला त्रास होत आहे व ऐकायला कमी येत आहे*.


*मी चार वर्षाचा होत पर्यंत चांगला बोलू शकत नव्हतो.आई माझी खूप काळजी घेत असे.माझा शाळेत प्रवेश  केल्यावर मला अभ्यासातील काही येत नाही.मी मतिमंद मुलगा आहे,हे शिक्षकांनी सांगितले.त्यामुळे माझे शिक्षण लवकरच सुटले.तिने जमेल तसे मेहनत घेत मला घरीच शिकवले*.


*माझी प्रयोगात गती पाहून मला पाहिजे ते साहित्य ती आणून देवू लागली.वयाच्या दहाव्या वर्षी माझी घरात स्वतःची प्रयोगशाळा होती,याचे सारे श्रेय आईलाच जाते.मी शाळेत फार काळ शिकलो नसलो तरी आईने मला शिक्षण देवून इतके लायक बनवले की मी साऱ्या जगाला बल्ब ची देणगी दिली*.


*माझ्यावर जेव्हा मतिमंद शिक्का पडला तेव्हा माझी आई माझ्या मागे ठामपणे उभी नसती तर जगात एक हजार पेक्षा अधिक शोध मी लावू शकलो नसतो.कायम येणारा लालसर ताप,ऐकण्याची कमी क्षमता,शरीराची कमी प्रतिकारशक्ती ही माझी कमजोरी होती.या साऱ्यावर मी मात करत मी यशस्वी शास्त्रज्ञ झालो तो आईमुळेच.प्रयोगाला मला पैसे कमी पडत म्हणून  मी जास्त काम करत पेपर,भाजीपाला ही विकण्याचे काम मी केले, पण प्रयोगात खंड पडू दिला नाही*.


*आई एक सूर असते त्यात क्वचित खटकणाऱ्या जागा येतात.त्या सुराचा आनंद मुलांना एकदा घेता आला की ते सुर आणखी श्रवणीय होतात.आईसाठी आणि मुलांसाठीही*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०